मुख्य सामग्रीवर वगळा

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त इंदापूरात भव्य आरोग्य शिबिर; हजारो नागरिकांनी घेतला मोफत आरोग्यसेवेचा लाभ

इंदापूर | प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व नारायणदास रामदास ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राचे कृषिमंत्री दत्तात्रय (दत्तामामा) भरणे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण भागातील हजारो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेत विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी, उपचार व मार्गदर्शन घेतले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अप्पासाहेब जगदाळे होते. यावेळी इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भरतशेठ शहा, डॉ. विद्युत शहा, शकीलभाई सय्यद आणि अक्षय सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले.


यावेळी बोलताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, "अजितदादा पवार यांनी विकासाबरोबरच सर्वसामान्यांच्या आरोग्यालाही प्राधान्य दिले आहे. त्यांच्या प्रेरणेतून समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असून ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचे हे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. लोकसेवेच्या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व आयोजक अभिनंदनास पात्र आहेत."
अप्पासाहेब जगदाळे म्हणाले, "समाजातील प्रत्येक घटक निरोगी असेल तरच सर्वांगीण विकास शक्य आहे. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी या तिन्ही क्षेत्रांना समान महत्त्व देणे आवश्यक असून समाजहिताचे असे उपक्रमच अजितदादा पवार यांना खरी मानवंदना ठरतात."
नगराध्यक्ष भरतशेठ शहा यांनी सांगितले की, "अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त समाजोपयोगी कार्य करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. त्यातूनच या भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. भविष्यातही अशाच लोककल्याणकारी वैद्यकीय व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल."
कार्यक्रमाला मुकुंदशेठ शहा, माजी नगराध्यक्षा सौ. अंकिताताई शहा, सौ. वैशालीताई भरतशेठ शहा, डॉ. संजय शहा, डॉ. रोहन हेगडे, डॉ. श्रेणिक शहा, डॉ. सुहास शेळके,धरमचंद लोढा,यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.
तसेच अंगद शहा, अजिंक्य डहाणे, निखिल महाजन, अमोल माने, मनोज राजगुरू, शेखर पवार, गणेश महाजन, आरशद सय्यद, श्रीनिवास माने, उमेश डावरे, बापू अडसूळ, गौरव ढावरे, गोरख राऊत, ॲड. केकान, जावेद शिकलकर, फिरोज पठाण, सौरभ शिंदे, गणेश पाटील, किशोर बागल, अमोल कारंडे, आदित्य बोराटे, प्रसाद सावंत, मयूर बनसोडे, सागर सूर्यवंशी, शिवाजी मखरे, बाळासाहेब सरवदे, सुभाष खरे, गायकवाड सर, हनुमंत कांबळे ,नितीन आरडे,आणि अशोकराव मखरे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
शिबिरामध्ये विविध आजारांची तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, औषधोपचार तसेच आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले. हजारो नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणारे हे शिबिर समाजोपयोगी उपक्रम म्हणून विशेष ठरले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...