इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने विविध सुविधांचे आज लोकार्पण
इंदापूर | प्रतिनिधी
इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शहा सांस्कृतिक भवन, इंदापूर येथे विविध नागरी सुविधा व उपक्रमांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री मा. दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या शुभहस्ते होणार आहे.
या कार्यक्रमात शहराच्या स्वच्छता व आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या अत्याधुनिक सिव्हर सक्शन-जेटिंग-डीवॉटरिंग मशीनचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण व्हावे यासाठी ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली (ॲप) सुरू करण्यात येणार आहे.
याशिवाय नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पीपीई (PPE) किटचे वाटप करण्यात येणार असून, या उपक्रमामुळे स्वच्छता व आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमास नगराध्यक्ष भरतशेठ शाह, उपनगराध्यक्ष बाबासाहेब नदके-पवार, मुख्याधिकारी रमेश डोंगे, तसेच सर्व नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पण्या