इंदापूर | प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व नारायणदास रामदास ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री मा. दत्तात्रय (दत्तामामा) भरणे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
यावेळी जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. अप्पासाहेब जगदाळे, इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मा. भरतशेठ शहा, डॉ. विद्युत शहा, शकीलभाई सय्यद, अक्षय सूर्यवंशी यांची समयोचित भाषणे झाली.
कार्यक्रमास वृक्षप्रेमी मुकुंदशेठ शहा, माजी नगराध्यक्षा सौ. अंकिताताई शहा, वैशालीताई शहा, डॉ. संजय शहा, डॉ. रोहन हेगडे, डॉ. श्रेणिक शहा, डॉ. सुहास शेळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच अंगद शहा, अजिंक्य डहाणे, निखिल महाजन, अमोल माने, मनोज राजगुरू, शेखर पवार, गणेश महाजन, आरशाद सय्यद, श्रीनिवास माने, उमेश डावरे, बापू अडसूळ, गोरख डावरे, गोरख राऊत, ॲड. केकान, जावेद शिकलकर, फिरोज पठाण, सौरभ शिंदे, गणेश पाटील, किशोर बागल, अमोल कारंडे, आदित्य बोराटे, प्रसाद सावंत, मयूर बनसोडे, सागर सूर्यवंशी, शिवाजी मखरे, बाळासाहेब सरवदे, सुभाष खरे, गायकवाड सर, हनुमंत कांबळे, अशोकराव मखरे सर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरोग्य शिबिरातील तपासणीचा तपशील,हृदयरोग तपासणी – १२० रुग्ण,मोतीबिंदू तपासणी – ९६० रुग्ण,सर्वसाधारण आजार तपासणी – २० रुग्ण,ईसीजी (ECG) तपासणी – ३०० रुग्ण,रक्तदाब (BP) तपासणी – ३४० रुग्ण,मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड – ३० रुग्ण,सर्वसाधारण तपासणी – ८०० रुग्ण,दंत तपासणी – ४५० रुग्ण,हाडांचे विकार तपासणी – ९५० रुग्ण,कान-नाक-घसा तपासणी – २६० रुग्ण,महिला रोगतज्ज्ञ तपासणी – १२० रुग्ण,आयुर्वेदिक तपासणी – ८० रुग्ण,OPD तपासणी – ७५० रुग्ण,मधुमेह तपासणी – ६० रुग्ण,हिमोग्लोबिन तपासणी – ५५ रुग्ण,रक्तगट तपासणी – ५८ रुग्ण एकूण विविध प्रकारच्या ५,३५३ तपासण्या करण्यात आल्या.महाकार्ड,१६० रेशनकार्ड १२० आधार कार्ड २० ऑनलाईन काढण्यात आले,
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की,स्व.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छा देण्यापेक्षा समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची परंपरा राष्ट्रवादी काँग्रेसने जपली आहे. आरोग्य ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज आहे. ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा सहज उपलब्ध होत नाही. अशा वेळी हे आरोग्य शिबिर जनतेसाठी वरदान ठरत आहे.
आज हजारो नागरिकांनी विविध आजारांची तपासणी करून घेतली आहे. अनेक रुग्णांमध्ये गंभीर आजारांचे प्राथमिक निदान झाले असून त्यांना पुढील उपचाराची दिशा मिळाली आहे. आरोग्य क्षेत्रात समाजसेवेची भावना जपणाऱ्या नारायणदास रामदास ट्रस्ट, डॉक्टरांची टीम आणि सर्व कार्यकर्त्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.
अजितदादांनी विकास आणि जनकल्याणाचा विचार नेहमीच अग्रक्रमाने केला. त्यांच्याच प्रेरणेतून अशा लोकाभिमुख उपक्रमांचे आयोजन होत आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचे कार्य पुढेही सुरू राहील."
अप्पासाहेब जगदाळे (माजी चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर) म्हणाले की,आजच्या धावपळीच्या जीवनात ग्रामीण भागातील अनेक नागरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे किरकोळ आजार गंभीर स्वरूप धारण करतात. हे शिबिर म्हणजे केवळ तपासणी नसून जनजागृतीचे मोठे अभियान आहे.
अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली विकासाबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम सातत्याने होत आहे. मोफत तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची निवड आणि पुढील उपचाराची व्यवस्था यामुळे सामान्य नागरिकांचा मोठा आर्थिक भार कमी होणार आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या शिबिराचा मोठा लाभ झाला आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात आरोग्याविषयी जागरूकता वाढून निरोगी समाज निर्मितीस मदत होईल."
नगराध्यक्ष भरतभाऊ शहा (आयोजक)म्हणाले की,अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त समाजाला काहीतरी देण्याच्या भावनेतून या भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. इंदापूर तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी हा आमचा उद्देश होता.
आज विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून हजारो तपासण्या करण्यात आल्या. मोतीबिंदू, हृदयरोग, हाडांचे विकार, दंत तपासणी, महिला रोग, मधुमेह यांसारख्या विभागांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे अनेक रुग्णांची पुढील उपचारांसाठी नोंदणी करण्यात आली आहे.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, सर्व मान्यवर, डॉक्टर, स्वयंसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नारायणदास रामदास ट्रस्ट आणि इंदापूर तालुक्यातील जनतेचे मी मनःपूर्वक आभार मानतो. भविष्यातही अशा लोकहिताच्या उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येईल."आसे मत नगराध्यक्ष भरतभाऊ शहा,यांनी व्यक्त केले,
टिप्पण्या