मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

* इंदापूर अर्बन बँकेचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सलग 2 वर्षांसाठी गौरव!-सलग दोन वर्षे शून्य टक्के एनपीए!•हर्षवर्धन पाटील यांचेकडून अभिनंदन!*

इंदापूर इंदापूर : प्रतिनिधी दि.30/9/24               राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या इंदापूर येथील इंदापूर अर्बन को-ऑप बँक लि. बँकेचा सन 2022-23 व 2023-24 या दोन्हीं आर्थिक वर्षासाठी शून्य टक्के एनपीएच्या सक्षम अशा उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या गुणगौरव सोहळ्यामध्ये शनिवारी (दि.28) या दोन्हीं वर्षाकरिता 2 स्मृतीचिन्हे व प्रशस्तीपत्रे देऊन गौरव करण्यात आला.          पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशनचा सन 2022/23 व 23-24 या दोन्हीं वर्षांकरिता झालेल्या नागरी सहकारी बँक गुणगौरव समारंभामध्ये हा गौरव करण्यात आला. इंदापूर तालुक्यातील युवकांना स्वयंरोजगार निर्मितीसाठी कर्ज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने कर्मयोगी शंकररावजी पाटील, राजेंद्रकुमार घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली हर्षवर्धन पाटील यांनी बँकेची स्थापना केली. बँकेच्या या गौरवाबद्दल इंदापूर अर्बन बँकेचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर अर्...

*श्री क्षेत्र नंदिकेश्वर परिसराचा होणार कायापालट,आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडून ५ कोटींचा निधी मंजुर*

इंदापूर तालुक्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले दगडवाडी येथील श्री क्षेत्र नंदिकेश्वर परिसराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या पुर प्रतिबंधात्मक संरक्षक भिंत व घाट बांधणीच्या कामासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून आज सुमारे ५ कोटींचा निधी मंजुर झाला असुन या निमित्ताने आमदार भरणे यांनी महिनाभरापूर्वी गावकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. श्री क्षेत्र नंदिकेश्वर हे निरा नदीच्या काठावर वसलेले महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असुन हे एक पुरातन हेमाडपंथी मंदिर आहे.या तीर्थक्षेत्राचा उल्लेख वेदपुराणातही आढळतो. या ठिकाणी वर्षभर असंख्य भाविकांची मंदियाळी असते.त्यामुळे या तीर्थक्षेत्राचे महत्व लक्षात घेत आमदार दत्तात्रय भरणे यांनी या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आजवर लाखो रुपयांचा निधी दिला असुन यातुन अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. मात्र हे देवस्थान निरा नदीच्या अगदी काठावर वसले असल्यामुळे निरा नदीला येणाऱ्या पुरामुळे या मंदिराला धोका निर्माण होऊ शकतो.त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आमदार दत्तात्रय भरणे ...

*पळसदेव येथे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ*

इंदापूर तालुक्यातील प्रत्येक नागरिकांच्या दृष्टी आरोग्याचा विचार करून  प्रवीण भैय्या माने मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर पळसदेव गावी संपन्न झाले. पळसदेव आजूबाजूच्या गावातील असंख्य नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन आपली मोफत नेत्र तपासणी करून घेतली.  सकाळी दहा वाजता माजी बांधकाम व आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे प्रविण माने यांच्या शुभहस्ते या शिबिराच्या उदघाटन पार पडले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना या प्रदूषित वातावरणात नागरिकांना सध्या दृष्टीदोष संदर्भातील असंख्य आजारांना सामोरे जावे लागत असल्याने आपण हे नेत्रतपासणी शिबीर राबवले असून यातून मोतीबिंदू संदर्भातील समस्या अथवा चष्म्याची गरज असणाऱ्या रुग्णांना प्रामुख्याने सेवा देण्याचा निर्धार केला असल्याचे सांगितले.  निलेश रंधवे, अमरसिंह मारकड, तुषार चव्हाण, अमोल डोंगरे, छगन बनसुडे, दीपक सातव, देविदास लावंड, अंकुश दोरकर व अक्षय भोसले यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.  या कार्यक्रमाच्या निमित्ताने छायाताई पडसळकर, वामनतात्या वीर, किरण लावंड,...

*भिगवण येथील नेत्र तपासणी शिबिरास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद प्रविण भैय्या माने यांच्या संकल्पनेतून तालुकाभर शिबिर राबवले जाणार*

इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे माजी बांधकाम आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे श्री प्रवीण माने यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिरास भिगवणकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने सुरवात झाली. भिगवण ग्रामपंचायत कार्यालय येथे सकाळी दहा ते पाच या वेळेत ८६४ नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली असून यातील ३९४ नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले तर १६ नागरिकांची पुणे भारती विद्यापीठ येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.  पुढील ८ दिवस तालुक्यातील पळसदेव, बिजवडी, काटी, वडापुरी, निमगाव, निमसाखर, सणसर, लासुर्णे, निरवांगी, माळवाडी, इंदापूर,  कळस, वालचंदनगर, बावडा, लाखेवाडी या ठिकाणी हे शिबिर पार पडणार आहे तरी याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी प्रवीण माने यांनी केले. भिगवण येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे दादासाहेब थोरात, आप्पासो गायकवाड, पंकज काशिद, प्रसाद जगताप यांनी आयोजन केले होते.  या कार्यक्रमाच्या निमित्ताने सरपंच दीपिकाताई क्षीरसागर, उपसरपंच मुमताज शेख, प्रदीप गायकवाड, मनोज राक्षे, अण्ण...

*सावतामाळी प्रतिष्ठान ट्रस्टच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार*

निमगाव केतकी येथील श्री संत सावता माळी प्रतिष्ठान ट्रस्टच्या अध्यक्षपदी भानुदास राऊत, उपाध्यक्ष पदी ॲड.संदीप शेंडे, सचिव पदी निलकंठ भोंग तर खजिनदार पदी ज्ञानदेव भोंग यांची नुकतीच सर्वानुमते निवड झाली.  या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा निमगाव केतकी येथील श्री. संत सावतामाळी चौक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला सत्कार समारंभ माजी बांधकाम आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे तथा संचालक सोनाई उद्योग समूह प्रवीण माने यांच्या हस्ते करण्यात आला.   यावेळी श्री संत सावतामाळी प्रतिष्ठान ट्रस्टच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक उपक्रम राबवून सर्वसामान्यांना न्याय दिला जातो, गोरगरिबांचे लग्न, किंवा इतर कार्यक्रमासाठी नाममात्र भाड्यावर कार्यालय खुले केले असल्याने सर्वसामान्यांना याचा लाभ होत असल्याचे मत माने यांनी व्यक्त केले. आज पार पडलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन बबन खराडे व दादासाहेब शेंडे यांच्यावतीने करण्यात काळे होते तर यावेळी संदीप भोंग, देविदास भोंग,ॲड.सचिन राऊत माजी उपसरपंच अशोक मिसाळ, सोमनाथ भोंग, महेश जठार, मंगेश भोंग, बाळू डोंगरे, पवन मिसाळ, तसेच ट्रस्टचे सर्व संचालक व नागरिक...

*जेष्ठ नागरिक संघाच्या मासीक* *मिटींगला फेस्कॉमचे नवनिर्वाचीत* *अध्यक्षांची सदिच्छा* *भेट*

= = = = = = = = = = = = = = =  . (महादेव चव्हाण सर यांचे कडून) आज वार शनिवार दिनांक 28/9/2024 रोजी  ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूर येथे28 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 4.30 वाजता महिन्याच्या मिटींगला सुरुवात झाली. प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव हनुमंत शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहिल्या प्रथम या महिन्यातील ज्येष्ठांचे वाढदिवस साजरे करण्यात आले त्यावेळी  संघाचे अध्यक्ष चित्तरंजन आबा पाटील. संघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार गुजर, माजी अध्यक्ष बाबासाहेब घाडगे, उपाध्यक्ष भानुदास पवार, खबाले महाराज यांच्या शुभहस्ते ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य हमीदभाई आत्तार , पांडुरंग जगताप, रघुनाथ खरवडे, बच्चू शेठ कांबळे,श्री/सौ.जोशी, मॅडम,ज्योतीराम अनपट यांनी वाढदिवसानिमित्त संघाला देणगी म्हणून 2100 रूपये दिले. चौरे महाराज यांनी देणगी म्हणून 500 दिले. ज्येष्ठ नागरिक संघामध्ये विविध उपक्रम राबवले जातात त्यासाठी पैशाची फार मोठी गरज असते .त्यातूनच उपक्रम राबवून ज्येष्ठांना मदत केली जाते. आरोग्य शिबीर,  ज्येष्ठांसाठी सहलींचे आयोजन  करणे, वृक्षारोपण, व्याख्यानमा...

*विविध क्षेत्रात नियुक्त युवकांचा प्रविण माने यांच्यातर्फे सत्कार..!*

इंदापूर  सध्याच्या स्पर्धा युगात इंदापूर तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत, मोठ्या कष्टाने सरकारी नोकरी पटकावली. अशा युवकांचा बांधकाम आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे श्री प्रविण माने यांनी आज सोनाई पॅलेस येथे सत्कार केला.  युवकांचे अशा पद्धतीने करण्यात येणारे सत्कार हे केवळ त्यांचे कौतुक किंवा कसलाही शिष्टाचार नसून आपल्यातूनच पुढे गेलेल्या या सर्व मान्यवरांचा समाजाने प्रेरणा घ्यावी व भविष्यातही असे कर्तृत्ववान युवक घडावे यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन यावेळी प्रविण माने यांनी केले. पीएसआय पदी निवड झालेले बावडा गावचे महेश भीमराव गायकवाड, सातारा पोलीसमध्ये भरती झालेली रेडणी गावची सायली अंकुश कुंभार, पुणे पोलीसात भरती झालेले रेडणी गावचे सौरभ योगीनाथ माने, उत्कर्षा योगीनाथ माने, ऋतुजा योगीनाथ माने व काटी गावचे सलीम हसन शेख यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने समदभाई सय्यद, अमोल मुळे, संजय शिंदे, नागेश गायकवाड, महादेव लोखंडे,अली मोमीन, संदीप सोलनकर, श्रीकांत मखरे,आनंद केकान, विशाल गारदी, विनायक रणदिवे, विशाल कांबळे, र...

*चांदणी चौक दिगंबर जैन मंदिर मध्ये दशलक्षण महापर्व निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, पालखी सोहळा, उपवास व्रतीं ची शोभायात्रा तसेच पारणे सोहळा संपन्न*

इंदापूर , डॉ. संदेश शहा. पुणे चांदणी चौक येथील श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर मध्ये, दिगंबर जैन समाजाचे भाद्रपद दशलक्षण महापर्व विविध पारंपरिक धार्मिक उपक्रमांनी संपन्न झाले.  या पर्वाची बुधवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी षोडषकारण व्रता पासून सुरूवात होवून बुधवार दिनांक सप्टेंबर रोजी अनंत पौर्णिमेच्या दिवशी क्षमावाणी या कार्यक्रमाने दशलक्षण धर्मपर्वाची समाप्ती मोठ्या उत्साहात पालखी मिरवणुकीने झाली. यानिमित्त जैन मंदिर मध्ये भव्य मंडप उभारण्यात आला होता. यावेळी सामूहिक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. मंदिरावर करण्यात आलेली नेत्रदीपक विद्युत रोषणाई सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. या दशलक्षण धर्म पर्वा मध्ये दररोज जैन मंदिरामध्ये सकाळी महाभिषेक, विश्र्वशांती साठी महाशांती धारा, दशलक्षण पर्व पूजन, सायंकाळी मंगल आरती व त्यानंतर सांगानेर ( राजस्थान) येथील अवनीश शास्त्री यांचे दररोज दशधर्मावर प्रवचन इत्यादी विविध धार्मिक कार्यक्रमांचे नित्यनियमाने बारा दिवस आयोजन करण्यात आले. या दशलक्षण धर्मपर्वात उत्तम क्षमा, मार्दव, आर्जव, शौच, ...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये भव्य आंतरशालेय, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.*

इंदापूर  जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडी संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.चित्रलेखा ढोले मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त JBVP चषक, भव्य आंतरशालेय, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन. जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,  प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल, विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमानाने संस्थेच्या उपाध्यक्षा मा.सौ.चित्रलेखा ढोले मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त JBVP चषक, भव्य आंतरशालेय राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.  *ही स्पर्धा दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे.* स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून या स्पर्धेद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांचे उज्वल भविष्य घडावे, आदर्श पिढी निर्माण व्हावी, उत्तम वक्ता हा शालेय जीवनापासूनच घडत असतो म्हणूनच या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. *स्पर्धेची विभागणी तीन गटांमध्ये करण्यात आलेली आहे.* *लहान गट* इयत्ता पहिली ते चौथी *विषय*-1)सांग सांग भोलानाथ आईचा मोबाईल हरवेल काय? 2) मला घडवते माझी शाळा. 3 )माझी आई माझा गुर...

*उरूस निमित्ताने प्रविण माने यांची लुमेवाडी दर्ग्यास भेट*

इंदापूर :- तालुक्यातील लुमेवाडी येथील प्रसिद्ध दर्गा हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपुरी बाबा यांच्या दर्ग्याचा उरूस समस्त लुमेवाडी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्ताने माजी बांधकाम आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे प्रविण माने यांनी गाजी - ए - मिल्लत सुफी संत हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपूरी बाबांच्या मजारवर चादर चढवून दर्शन घेतले. यावेळी उपस्थित ग्रामस्थ व उत्सव कमिटी सदस्यांशी माने यांनी संवाद साधला तसेच उत्सव कमिटीच्या वतीने प्रविण माने यांचा सत्कार ही करण्यात आला. इंदापूर तालुक्यासह संपूर्ण राज्यभर या दर्ग्यासाठी लुमेवाडी प्रसिद्ध असून सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असणाऱ्या जोधपुरी बाबांच्या दर्ग्यावर हिंदू - मुस्लिम भाविक मोठ्या भक्तीभावाने दरवर्षी येत असतात. प्रविण माने यांनी लुमेवाडी येथे दिलेल्या भेटीच्या वेळी बाळासाहेब कोकाटे, राजूभैय्या शेख, मोहन काटे, सुरेश कोकाटे, नागेश गायकवाड, नवनाथ कोकाटे, सनी बंडगर, गणेश मोहिते, शाहेजमान शेख, नियाज़ शेख, वाहिद सय्यद, शरीफ शेख, जाकिर पठान, मुजावर आदम, अहमद शेख, यासीन काजी, जाबिर पठान, सद्दाम काझी, रिजवान मुलानी, रीयाज स...

*इंदापूर महाविद्यालयामध्ये वृक्षारोप व व्याख्यानाचे आयोजन करून राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा*

इंदापूर  कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे 24 सप्टेंबर हा राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण व व्याख्यानाचे आयोजन करून हा राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला.     सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे , विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर, राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी स्वयंसेवक कुमार शिंदे व आशिष माने उपस्थित होते.      अध्यक्ष मनोगत प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्य सर्वोत्कृष्ट चालू आहे व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन श्रमदान सामाजिक कार्य कसे करावे, यातून स्वतःची प्रगती, स्वतःचा व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा होतो व भारताचा अतिशय सुजन नागरिक कसा बनतो आणि तो दुसऱ्याला बनवण्यास भाग पडतो यासंदर्भात मार्गदर्शन केले.    कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी प्रा...

*राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा विविध घटकांशी संवाद जाणून घेतल्या अपेक्षा व संकल्पना*

पुणे, दि. २४: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज आपल्या पुणे दौऱ्यात राजभवन येथे विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी जिल्ह्यातील विविध विकास विषयक प्रश्नांवर चर्चा केली. तसेच उद्योग, संस्कृती, कला, खेळ आदी घटकांशी संवाद साधून त्यांच्या विकास विषयक अपेक्षा, समस्या व संकल्पना जाणून घेतल्या. राज्यपाल यांच्याशी चर्चा करण्यासाठी खासदार मेधा कुलकर्णी, श्रीरंग बारणे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार संजय जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आदी उपस्थित होते. राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांच्या समोर प्रामुख्याने...

*हयाला म्हणतात शिंदेशाही... नराधमांना माफी नाही..डायरेक्ट शुट-सिमाताई कल्याणकर*

इंदापूर: -बदलापूर येथे घडलेल्या घटनेबद्दल व काल आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांवर गोळीबार केला व पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या व त्यामधे त्याचा मृत्यू झाला. या गोष्टीचं विरोधक भांडवल करत आहे व पोलिसांना टार्गेट करत आहे आणि त्यांच खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे.शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख श्री महेश दादा पासलकर शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सौ सीमा प्रशांत कल्याणकर यांच्या वतीने महाराष्ट्र पोलिसांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इंदापूर पोलिस स्टेशन मध्ये श्री सुर्यकांत कोकणे पोलिस निरीक्षक इंदापूर तालुका व सर्व पोलीस अधिकारी वर्ग यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार व पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला यावेळी बोलताना सौ सीमा कल्याणकर म्हटल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि आपले संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांची हि शिवसेना आहे महिला व मुलींवर होणारे अत्याचार सहन केले जाणार नाहीत महाराष्ट्र सरकार व गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस  यांचे ही यावेळी आभार मानले यावेळी श्री आण्...

"युवकांनी विकसित भारताचे ब्रँड अंबेसिडर व्हावे : ना. रक्षाताई खडसे( राज्यमंत्री,क्रीडा ,युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार)

इंदापूर, डॉ. संदेश शहा. राज्यातील तरुणांनी माय पोर्टल व्दारे विकसित भारत या अभियानात सामील होणे गरजेचे आहे. युवा पिढीने विकसित भारताचे स्वप्न साकारण्या करता पुढे येवून विकसित भारताचे ब्रँड अँबेसेडर व्हावे,असे आवाहन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री नामदार रक्षाताई खडसे यांनी केले. पुणे खडकी मधील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात विकसित भारत अँम्बेसेडर युवा कनेक्ट उपक्रमातंर्गत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी महाविद्यालय आवारात एक झाड आईच्या नावे ( एक पेड मां के नाम ) या केंद्रशासन प्रणित उपक्रमातंर्गत रक्षा खडसे यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी त्यांनी महाविद्यालयातील युवा यु ट्युबरर्सशी सुसंवाद साधला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी रक्षा खडसे यांनी उपस्थित युवा पिढीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या भारत सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. विशेषत: त्यांनी 'माय भारत पोर्टल' विषयी माहिती देऊन यात सर्वांनी नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. विकसित भारताचा आराखडा शिक्षण, आरोग्य...

*धनगर समाज बांधवाना एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अमलबजावणी करणे बाबत हर्षवर्धन पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र*

इंदापूर:-  धनगर समाज बांधवाना एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अमलबजावणी करणे बाबत..मा.ना.श्री. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, तथा सामाजिक मंत्री, महाराष्ट्र राज्य.यांना मा.हर्षवर्धनभाऊ पाटील माजी मंत्री यांचे पत्र संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाज हा पिढ्यानपिढ्या पासून मेंढपाळाचा व्यवसाय करीत आलेला आहे. अत्यंत शांत, संयमी व काबाडकष्ट करणारा बहुतांश धनगर समाज हा महाराष्ट्रातील आर्थिक जडण घडणातील एक महत्वाचा घटक आहे. परंतु सध्या या समाज बांधवांच्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी या जमातीचा अनुसूचित जातीमध्ये समावेश होणेबाबत अनेक वर्षापासून तीव्रतेने मागणी होत आहे. व या अनुषंगाने विविध पद्धतीने शांततेच्या मार्गाने आंदोलने पुकारण्यात येत आहेत. सध्या पंढरपूर येथे सकल धनगर समाजाचे मागील १३ दिवसापून आमरण उपोषण सुरु आहे. या समाजचे शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक मागासलेपण लक्ष्यात घेता हि मागणी योग्य आहे. तरी महाराष्ट्र शासनाने धनगर समाजाच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने हिताचा निर्णय तातडीने घ्यावा, आशी विनंती मा.हर्षवर्...

*"आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीचे प्रभावी साधन ठरणार ...हर्षवर्धन पाटील* ."

इंदापूर  कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत या विकास केंद्राचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते  दूरदृश्य प्रणाली द्वारे करण्यात आले महाविद्यालयातील शाहीर अमर शेख सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तसेच कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे व उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे  यांचेही मार्गदर्शन लाभले. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथे झालेल्या कार्यक्रमात डिजिटल पद्धतीने केले. या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून 5 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी भारतीय पारंपरिक कौशल्यावर आधारित व्यवसायांचा विकास करण्याच्या दृष्टीने भारत सरकार प्रयत्न करीत असल्याचे सांगून त्याचाच एक भाग म्हणून अशा व्यवसायांना वित्तीय सहाय्य ...

*स्पर्धा परीक्षेत चमकदार कामगिरी करणाऱ्या उमेदवारांचा प्रवीण माने यांच्या वतीने सत्कार*

इंदापूर   गेले काही दिवस इंदापूर तालुक्यातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत आपल्या कर्तृत्वाचा ठसा सातत्याने उमटवताना दिसत आहेत. नुकत्याच हाती आलेल्या निकालात इंदापूर तालुक्यातील विविध गावातील विद्यार्थ्यांनी यशाला गवसणी घालून सरकारी नोकऱ्या मिळवल्या आहेत. अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा भावी आमदार. प्रवीण माने यांनी सोनाई पॅलेस येथे सत्कार करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. डाळज नं.१ येथील रोहन रवींद्र भोसले यांची ग्राम महसूल अधिकारी पदी, इंदापूरचे युवराज शंकर देवकाते यांची एस आर पी एफ पोलीस दल सोलापूर, बाभुळगावचे प्रथमेश तानाजी मोरे यांची मुंबई शहर पोलीस दलात, बिजवडीचे अभिजीत जेजेराम काळेल यांची मुंबई शहर पोलीस दलात, बिजवडीच्या शितल शिवाजी काळेल यांची रायगड पोलीस दलात, डाळज नं.१ येथील ऋषिकेश दत्तात्रय जगताप यांची मुंबई शहर पोलीस दलात,  पळसदेव चे विनोद सुनील भोसले यांची एस आर पी एफ सोलापूर दलात, पिंपरी खुर्द चे किरण भागवत कडाळे यांची मुंबई शहर पोलीस दलात, पडस्थळ चे रणजीत वसंत बोंगाणे यांची एस आर पी एफ पुणे दलात, सणसर चे पूजा प्रकाश घाडगे यांची...

*भाऊंचे नेतृत्व व संस्था तुमच्यासाठी टिकल्या पाहिजेत - राजवर्धन पाटील तर राजवर्धन पाटील यांना अश्रू अनावर.भाऊंच्या पाठीशी उभे राहण्याचे केले आवाहन*

इंदापूर:  दि.23/9/24                  भाऊंचे नेतृत्व व संस्था तुमच्यासाठी टिकल्या पाहिजेत. सध्या भाऊंना जनतेसाठी अहोरात्र काम करताना, संस्था चालवताना किती त्रास होतो, त्याग करावा लागतो, वेदना होतात हे मी जवळून पाहत आहे... असे भाषणात नमूद करीत असताना अचानकपणे नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील हे भावनाविश झाले...त्यांना अश्रू अनावर झाले... त्यामुळे राजवर्धन पाटील यांना काही वेळ भाषण थांबवावे लागले... यावेळी भावनाविश वातावरणामुळे संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले होते.          शहाजीनगर (ता. इंदापूर) येथे निरा भिमा सहकारी साखर कारखान्याची 26 वी वार्षिक सर्वसाधारण सोमवारी (दि.23) संपन्न झाली. या सर्वसाधारण सभेमध्ये राजवर्धन पाटील यांनी तालुक्याच्या विकासाचे हित डोळ्यासमोर ठेवून केलेले अतिशय विचारी व अभ्यासपूर्ण भाषण सर्वांच्या कायम स्मरणात राहील असेच झाले. कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये बोलत असताना राजवर्धन पाटील भावनाविश झाले... डोळ्यातून अश्रू वाहू लागले.. त्यानंतर राजवर्ध...

*मोफत तुळजापूर व पंढरपूर दर्शन यात्रा- सौ. चित्रलेखा श्रीमंत ढोलेआदर्श सरपंच, ग्रामपंचायत लाखेवाडी उपाध्यक्षा, जय भवानीगड विकास प्रतिष्ठान*

इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी गावातील फक्त महिला भगिनींना दि.०६ ऑक्टोबर २०२४ रोजी मोफत तुळजापूर, पंढरपूर दर्शन यात्रेचे आयोजन केले आहे. तरी इच्छुक महिला भगिनींनी दि.०२ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पुढील मोबाईल नंबरवर संपर्क करून आपली नाव नोंदणी करावी.नाव नोंदणी शिवाय दर्शन यात्रेचा लाभ मिळणार नाही.संपर्क क्रमांक सदाशिव बागल मो.नं: 9922361352 गणेश डोंगरे मो.नं :- 8999928105 उन्मेश बोरकर मो.नं: 9960879687 आशी माहीती आयोजक सौ. चित्रलेखा श्रीमंत ढोलेआदर्श सरपंच, ग्रामपंचायत लाखेवाडी उपाध्यक्षा, जय भवानीगड विकास प्रतिष्ठान यांनी दिली या वेळी अध्यक्ष श्रीमंत ढोले सर व इतर मान्यवर उपस्थित होते. 

*जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानीत हरणावळ गुरुजी यांचा प्रवीण माने यांच्या वतीने सत्कार.*

इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये अतिशय उत्कृष्ट व गुणवत्तापूर्वक शिक्षण प्रसारात नेहमीच अग्रणी असणारी शिक्षण संस्था म्हणजे गोखळी येथील गुरूकुल विद्यामंदिरचे नाव संपूर्ण पुणे जिल्ह्यात करण्याचे काम करणाऱ्या गुरुकुल विद्यामंदिर गोखळीचे संस्थापक अध्यक्ष श्री बाळासाहेब हरणावळ गुरुजी यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला.पुरोगामी लोकशाही आघाडी, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक-शिक्षिका संघ यांच्यावतीने पुरंदर येथे हरणावळ गुरुजींचा सत्कार करण्यात आला.  गोखळी सारख्या ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीत आज तब्बल ३००० विद्यार्थी शाळेत शिकत आहेत. बरेच विद्यार्थी नवोदय शिष्यवृत्ती, जेईई व नीट परीक्षेत चमकले असून हे हरणावळ गुरुजींचे यश आहे. या निमित्ताने माजी बांधकाम आरोग्य सभापती श्री प्रवीणभैया माने यांनी हरणावळ गुरुजींचा सन्मान करून त्यांना कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांना भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी समदभाई सय्यद, निलेश रंधवे, छगन बनसुडे, राजेश अवचर, अंकुश दोरकर, प्रविण निगडे, जोतिराम अनपट, संकेत वाघमोडे, आकाश पवार आण...

*नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याकरीता प्रयत्न करणार- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी*

* वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा देण्याचा प्रयत्न- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* पुणे, दि.२१: पुण्यातील नवीन विमानतळाचे काम चांगले झाले असून या नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरीसाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.  भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कमिन्स महाविद्यालय, कर्वेनगर येथे आयोजित जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, सुप्रिया सुळे, आमदार उमा खापरे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, प्राधिकरणाचे मुख्य प्रबंधक अंशुमाली श्रीवास्तव, प्रकल्प संचालक संजय ...

*आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी सर्व संबंधितांनी चोखपणे कर्तव्य बजावावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे*

पुणे, दि.२०: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी जिल्हा प्रशासनाने चांगले काम केले असून त्याच पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी सर्वांनी दक्ष राहून चोखपणे कर्तव्य बजावावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.  विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, निवासी उप जिल्हाधिकारी ज्योती कदम, निवडणूक विषयक सर्व समन्वय अधिकारी, संबंधित विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आदी उपस्थित होते.  डॉ. दिवसे म्हणाले, प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणुकीशी संबंधित सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निवडणूक विषयक प्रशिक्षण सत्र आयोजित करावेत. त्यामध्ये प्रत्येक बाबीचे सूक्ष्म नियोजन करुन प्रशिक्षण देण्यात यावे. निवडणूक प्रक्रिया सुलभतेने पार पाडण्याच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा आणि नियमांचा अभ्यास करावा.  जिल्हा निवडणूक ...

*इंदापूर शहरात गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात व शांततेत*

 इंदापूर:- मानाचा पहिला गणपती ११९ वर्षाची परंपरा असलेला सिध्देश्वर गणेश मित्र मंडळाच्या गणेश मुर्तीची प्रशासकिय अधिकारी व मान्यवरांच्या हस्ते आरती होऊन विसर्जन मिरवणूकीस सुरुवात झाली . पालखीतील विराजमान आकर्षक गणेशाची मुर्ती लक्षवेधी होती . तसेच महिलांचाही मोठया प्रमाणात सहभाग हे या मंडळाचे वैशिष्ट . मुख्य चौक असलेल्या नेहरू चौक येथे इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती इंदापूर पोलीस स्टेशन व इदापूर नगर परिषद यांनी स्वागत कक्ष उभारून येणाऱ्या सर्व गणेश मंडळाचे स्वागत केले . दुपारी १२ वाजता मानाचा पहिला गणपती नेहरू चौकात आल्या नंतर इदापूर शहर नागरी संघर्ष समिती . इंदापूर पोलीस स्टेशन, व नगर परिषदे तर्फे स्वागत करण्यात आले त्यानंतर विसर्जन मिरवणूकीस प्रारंभ झाला . ही मिरवणूक रात्री १२ वाजेपर्यंत चालली होती . सकाळी मानाचे गणपती गेल्या नंतर संध्याकाळी विद्यूत रोषणाईचे आकर्षक गणेश मंडळे मूख्य नेहरु चौकात आली .आकर्षक नेत्रदिपक रथ हे विशेष लक्षवेधी आकर्षण होते . नेहरु चौक येथे मंडळाच्या स्वागती साठी इदापूर शहर नागरी संघर्ष समिती . इंदापूर पोलीस स्टेशन व इंदापूर नगर परिष...

*अल्पसंख्यांक विभाग इंदापूरच्या वतीने लहान मुलांना बिस्किट आणि मिठाईची वाटप-अहेमद रजा सय्यद*

इंदापूर: - सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा जशने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त निघणाऱ्या जुलूस मध्ये आझम फाउंडेशन इंदापूर आणि राष्ट्रवादी काँग्रस पार्टी अल्पसंख्यांक विभाग इंदापूरच्या वतीने लहान मुलांना बिस्किट आणि मिठाईची वाटप इंदापूर नगरीचे मा. नगराध्यक्ष विठ्ठलराव (आप्पा)ननवरे, समाजसेवक प्रा. अशोक मखरे सर, मा. नगरसेवक दादासाहेब सोनवणे, राष्ट्रवादी इंदापूर शहर युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक इंदापूर शहराध्यक्ष अहेमदरजा (तशुभाई) सय्यद मा. नगरसेवक अँड मा. नगरसेवक इब्राहिम (बाबा) शेख गिरीशजी शहा, मौलाना हाजी हाफिज अब्दुल करीम मुशाहिद, आझादभाई पठाण, अँड फिरोजभाई सय्यद, अलीभाई मोमीन, आझम फाउंडेशन इंदापूरचे सदस्य सुभाषशेठ ननवरे, अँड आनंदजी केकान, शरीफभाई शेख, जुबेरभाई सय्यद, आशपाकभाई शेख, मोरे महाराज, मुन्नाभाई बागवान, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी मखरे, शाहरुखभाई कुरेशी, यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्व धर्मीय नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. *कार्यक्रमाचे आयोजन आझम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अहेमदरजा (तशुभाई) सय्यद आणि उपाध्यक्ष इम्रानभाई शे...

*ईद-ए-मिलाद निमित्ताने मा.मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिल्या शुभेच्छा*

इंदापूर:-इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथील दर्गा मस्जिद या ठिकाणी जाऊन दर्ग्यावर चादर चढवली व उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांना ईद च्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.    हर्षवर्धन पाटील म्हणाले की इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांनी संपूर्ण जगासाठी शांततेचा संदेश दिला त्यांच्या जयंती निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो.'     यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात हर्षवर्धन पाटील यांचे स्वागत केले तसेच त्यांच्याशी संवाद साधला.

*हजरत मोहम्मद पैगंबर जयंती (ईद इ मिलाद)निमित्त इंदापूर येथे चार वर्षांपासून तेजपृथ्वी ग्रुप च्या वतीने दरवर्षी मिठाई,फळे पाणी वाटप*

इंदापूर;- हजरत मोहम्मद पैगंबर जयंती (ईद इ मिलाद)निम्मित आज इंदापूर येथे जुल्लस निघाला होता.या वेळी तेजपृथ्वी ग्रूपच्या वतीने पाणी बॉटल चे वाटप करण्यात आले ,या वेळी इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोकणे धारूरकर वकील सह इतर मान्यवर उपस्थित होते.तेजपृथ्वी ग्रूपच्या संस्थापक अध्यक्षा सौ.अनिताताई खरात म्हणाल्या की इंदापूरमध्ये नेहमीच सर्वधर्म समभाव या पद्धतीने सर्व समाजात सलोखा राखण्याचे काम इंदापूरकर करतात तसेच ग्रुपच्या माध्यमातून आम्ही नेहमी सर्वधर्मसमभाव हीच भावना जोपासण्याचा प्रयत्न करतो आज माझ्या मुस्लिम बांधवांनी जुलूस चे आयोजन केले होते आणि भाद्रपद महिना असल्यामुळे ऊनाची तीव्रता पाहून आम्ही तेजपृथ्वी ग्रूपच्या माध्यमातून पाणी बॉटल वाटप करण्याचे ठरवले, यावेळी जुलसमधे लहान मुलं वयस्कर माणसं युवा वर्ग खूप मोठ्या प्रमानात सामील झाला होता,गेल्या तीन ते चार वर्षांपासून दरवर्षी मिठाई, फळे पाणी वाटप करण्याचे आयोजन तेजपृथ्वी ग्रुप करत असतो, इथून पुढेही सर्व धर्म समभाव ठेवण्यासाठी  आम्ही प्रयत्न करू या वेळी तेजपृथ्वी ग्रूपचे  प्रभारी सद्दाम बागवान, विशाल म्हेत्र...

*इंदापूर तालुक्यात विकास आघाडीच्या जाचकवस्ती, लासुर्णे, परीटवाडी शाखांची उद्घाटने आठवडाभरात 100 शाखा होणार!*

इंदापूर : प्रतिनिधी दि.16/9/24              इंदापूर तालुका विकास आघाडीच्या जाचकवस्ती, लासुर्णे, परीटवाडी या 3 शाखांची उद्घाटने गुरुवारी (दि.12) करण्यात आली. या 3 शाखांमुळे विकास आघाडीच्या इंदापूर तालुक्यातील शाखांची संख्या 85 एवढी झाली आहे.     तसेच इंदापूर तालुक्यात आगामी सहा-सात दिवसात विकास आघाडीच्या आणखी 15 शाखांची स्थापन करण्यात येणार आहेत. त्यामुळे इंदापूर तालुका विकास आघाडीच्या एकूण शाखांची संख्या 100 होणार आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरातच इंदापूर तालुका विकास आघाडीच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. इंदापूर विधानसभा मतदार संघातून हर्षवर्धन भाऊ पाटील यांनी निवडणूक लढवावी, याकरिता इंदापूर तालुका विकास आघाडी आग्रही असून, हर्षवर्धन भाऊ पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आणणेसाठी आंम्ही जीवाचे रान करू, असा निर्धार या शाखांच्या उद्घाटन प्रसंगी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. इंदापूर तालुका विकास आघाडीच्या शाखांमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.