= = = = = = = = = = = = = = = .
(महादेव चव्हाण सर यांचे कडून)
आज वार शनिवार दिनांक 28/9/2024 रोजी ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूर येथे28 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 4.30 वाजता महिन्याच्या मिटींगला सुरुवात झाली. प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव हनुमंत शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहिल्या प्रथम या महिन्यातील ज्येष्ठांचे वाढदिवस साजरे करण्यात आले त्यावेळी संघाचे अध्यक्ष चित्तरंजन आबा पाटील. संघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार गुजर, माजी अध्यक्ष बाबासाहेब घाडगे, उपाध्यक्ष भानुदास पवार, खबाले महाराज यांच्या शुभहस्ते ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य हमीदभाई आत्तार , पांडुरंग जगताप, रघुनाथ खरवडे, बच्चू शेठ कांबळे,श्री/सौ.जोशी, मॅडम,ज्योतीराम अनपट यांनी वाढदिवसानिमित्त संघाला देणगी म्हणून 2100 रूपये दिले. चौरे महाराज यांनी देणगी म्हणून 500 दिले. ज्येष्ठ नागरिक संघामध्ये विविध उपक्रम राबवले जातात त्यासाठी पैशाची फार मोठी गरज असते .त्यातूनच उपक्रम राबवून ज्येष्ठांना मदत केली जाते. आरोग्य शिबीर, ज्येष्ठांसाठी सहलींचे आयोजन करणे, वृक्षारोपण, व्याख्यानमाला, सामाजिक, शैक्षणिक, कार्य करणाऱ्या थोर व्यक्तींचे सत्कार आयोजित केले जातात. ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूर येथे फेस्काॅम पुणे प्रादेशिक विभाग अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री हनुमंत कुंभार गुरुजी यांचा सत्कार ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चित्तरंजन आबा पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. श्री हनुमंत कुंभार साहेब म्हणाले ज्येष्ठांसाठी शासनाच्या विविध योजना राबविण्यात येतात त्याचा लाभ ज्येष्ठांनी घेतला पाहिजे. ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूर या संघासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमा वेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिक संघाचे संचालक प्रमोद भंडारी, महादेव चव्हाण सर, सिकंदर इनामदार,भारत बोराटे सर, सदानंद गांधले, केशव बनसोडे, डोंगरे गुरुजी, पाणबुडे गुरुजी, क्षीरसागर साहेब, नितीन टूर चे मालक नितीन शेठ, चांदणे आबा, सुभाष महाजन सर यांनी आभार मानले सूत्रसंचालन संघाचे सचिव हनुमंत शिंदे साहेब यांनी केले.सर्व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजचा कार्यक्रम संपन्न झाला.
टिप्पण्या