*हजरत मोहम्मद पैगंबर जयंती (ईद इ मिलाद)निमित्त इंदापूर येथे चार वर्षांपासून तेजपृथ्वी ग्रुप च्या वतीने दरवर्षी मिठाई,फळे पाणी वाटप*
इंदापूर;- हजरत मोहम्मद पैगंबर जयंती (ईद इ मिलाद)निम्मित आज इंदापूर येथे जुल्लस निघाला होता.या वेळी तेजपृथ्वी ग्रूपच्या वतीने पाणी बॉटल चे वाटप करण्यात आले ,या वेळी इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोकणे धारूरकर वकील सह इतर मान्यवर उपस्थित होते.तेजपृथ्वी ग्रूपच्या संस्थापक अध्यक्षा सौ.अनिताताई खरात म्हणाल्या की इंदापूरमध्ये नेहमीच सर्वधर्म समभाव या पद्धतीने सर्व समाजात सलोखा राखण्याचे काम इंदापूरकर करतात तसेच ग्रुपच्या माध्यमातून आम्ही नेहमी सर्वधर्मसमभाव हीच भावना जोपासण्याचा प्रयत्न करतो आज माझ्या मुस्लिम बांधवांनी जुलूस चे आयोजन केले होते आणि भाद्रपद महिना असल्यामुळे ऊनाची तीव्रता पाहून आम्ही तेजपृथ्वी ग्रूपच्या माध्यमातून पाणी बॉटल वाटप करण्याचे ठरवले, यावेळी जुलसमधे लहान मुलं वयस्कर माणसं युवा वर्ग खूप मोठ्या प्रमानात सामील झाला होता,गेल्या तीन ते चार वर्षांपासून दरवर्षी मिठाई, फळे पाणी वाटप करण्याचे आयोजन तेजपृथ्वी ग्रुप करत असतो, इथून पुढेही सर्व धर्म समभाव ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू या वेळी तेजपृथ्वी ग्रूपचे प्रभारी सद्दाम बागवान, विशाल म्हेत्रे, संदिप रेडके व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या