इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये अतिशय उत्कृष्ट व गुणवत्तापूर्वक शिक्षण प्रसारात नेहमीच अग्रणी असणारी शिक्षण संस्था म्हणजे गोखळी येथील गुरूकुल विद्यामंदिरचे नाव संपूर्ण पुणे जिल्ह्यात करण्याचे काम करणाऱ्या गुरुकुल विद्यामंदिर गोखळीचे संस्थापक अध्यक्ष श्री बाळासाहेब हरणावळ गुरुजी यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला.पुरोगामी लोकशाही आघाडी, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक-शिक्षिका संघ यांच्यावतीने पुरंदर येथे हरणावळ गुरुजींचा सत्कार करण्यात आला.
गोखळी सारख्या ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीत आज तब्बल ३००० विद्यार्थी शाळेत शिकत आहेत. बरेच विद्यार्थी नवोदय शिष्यवृत्ती, जेईई व नीट परीक्षेत चमकले असून हे हरणावळ गुरुजींचे यश आहे.
या निमित्ताने माजी बांधकाम आरोग्य सभापती श्री प्रवीणभैया माने यांनी हरणावळ गुरुजींचा सन्मान करून त्यांना कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांना भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी समदभाई सय्यद, निलेश रंधवे, छगन बनसुडे, राजेश अवचर, अंकुश दोरकर, प्रविण निगडे, जोतिराम अनपट, संकेत वाघमोडे, आकाश पवार आणि इतर सहकारी उपस्थित होते.
टिप्पण्या