इंदापूर:-बदलापूर येथे घडलेल्या घटनेबद्दल व काल आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांवर गोळीबार केला व पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या व त्यामधे त्याचा मृत्यू झाला. या गोष्टीचं विरोधक भांडवल करत आहे व पोलिसांना टार्गेट करत आहे आणि त्यांच खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे.शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख श्री महेश दादा पासलकर शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सौ सीमा प्रशांत कल्याणकर यांच्या वतीने महाराष्ट्र पोलिसांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इंदापूर पोलिस स्टेशन मध्ये श्री सुर्यकांत कोकणे पोलिस निरीक्षक इंदापूर तालुका व सर्व पोलीस अधिकारी वर्ग यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार व पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला यावेळी बोलताना सौ सीमा कल्याणकर म्हटल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि आपले संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांची हि शिवसेना आहे महिला व मुलींवर होणारे अत्याचार सहन केले जाणार नाहीत महाराष्ट्र सरकार व गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे ही यावेळी आभार मानले यावेळी श्री आण्णा काळे उपजिल्हा प्रमुख श्री रामचंद्र जामदार तालुका प्रमुख श्री विजय पवार तालुका संघटक श्री शुभम जामदार शहर प्रमुख सौ रूपाली ताई रासकर सौ कमल लोंढे व तालुक्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते*
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या