इंदापूर:- मानाचा पहिला गणपती ११९ वर्षाची परंपरा असलेला सिध्देश्वर गणेश मित्र मंडळाच्या गणेश मुर्तीची प्रशासकिय अधिकारी व मान्यवरांच्या हस्ते आरती होऊन विसर्जन मिरवणूकीस सुरुवात झाली . पालखीतील विराजमान आकर्षक गणेशाची मुर्ती लक्षवेधी होती . तसेच महिलांचाही मोठया प्रमाणात सहभाग हे या मंडळाचे वैशिष्ट . मुख्य चौक असलेल्या नेहरू चौक येथे इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती इंदापूर पोलीस स्टेशन व इदापूर नगर परिषद यांनी स्वागत कक्ष उभारून येणाऱ्या सर्व गणेश मंडळाचे स्वागत केले . दुपारी १२ वाजता मानाचा पहिला गणपती नेहरू चौकात आल्या नंतर इदापूर शहर नागरी संघर्ष समिती . इंदापूर पोलीस स्टेशन, व नगर परिषदे तर्फे स्वागत करण्यात आले त्यानंतर विसर्जन मिरवणूकीस प्रारंभ झाला . ही मिरवणूक रात्री १२ वाजेपर्यंत चालली होती . सकाळी मानाचे गणपती गेल्या नंतर
संध्याकाळी विद्यूत रोषणाईचे आकर्षक गणेश मंडळे मूख्य नेहरु चौकात आली .आकर्षक नेत्रदिपक रथ हे विशेष लक्षवेधी आकर्षण होते .
नेहरु चौक येथे मंडळाच्या स्वागती साठी इदापूर शहर नागरी संघर्ष समिती . इंदापूर पोलीस स्टेशन व इंदापूर नगर परिषद यांनी स्वागत कक्ष उभारले होते .
या वर्षीचा गणेशोत्सव शांततेत, शिस्तबद्द खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला . यासाठी सर्वप्रशासकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाने चोख बंदोबस्त ठेवला होता . तहसीलदार जीवन बनसोडे,पोलीस निरीक्षक . सुर्यकांत कोकणे मुख्याधिकारी रमेश ढगे व कर्मचारी वर्गाचे विशेष सहकार्य मिळाले .
यावेळी संघर्ष समितीचे प्रा . कृष्णा ताटे, हमीदभाई आत्तार, महादेव चव्हाण , गोरख शिंदे , धरमचंद लोढा, अविनाश कोतमिरे, हाजी सलीमभाई बागवान , मच्छींद्र शेटे, भारत बोराटे, संतोष जामदार , रघुनाथ खरवडे , इ कार्यकर्ते उपस्थित होते .
टिप्पण्या