इंदापूर नगरपालिकेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण योजनेतून ग्रामीण पातळीवरील योग प्रशिक्षण देणारे उत्कृष्ट योग भवन उभारणार-मा.ना.हर्षवर्धन पाटील इंदापूर: शालेय विद्यार्थी, युवक, ज्येष्ठ नागरिक यांना योग साधनेचा उपयोग होऊन योगाच्या माध्यमातून चांगले आरोग्य उभे राहण्यासाठी इंदापूर नगरपालिकेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण योजनेतून ग्रामीण पातळीवरील योग प्रशिक्षण देणारे उत्कृष्ट योग भवन उभारणार असल्याची माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी(दि.30) दिली. पतंजली योग समितीने हर्षवर्धन पाटील यांच्याकडे योग भवन उभा करण्याची मागणी केली होती. पतंजली योग समितीच्या पदाधिकारी समवेत हर्षवर्धन पाटील यांनी जागेची पाहणी सकाळी केली. जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन नाविन्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करून पाच कोटी रुपये अपेक्षित खर्च असलेले एक उत्कृष्ट ग्रामीण भागातील योग भवन उभारण्याचा संकल्प हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी केला. यामध्ये एकाच वेळी पाचशे व्यक्ती योगसाधना करतील असे त्याचे भव्य स्वरूप असेल. यावेळी इंदापूर अर्बन बँक...
SHIVSRUSTHI NEWS