इंदापुर: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी इंदापूर नगरपरिषदेची ऑनलाईन विशेष सभा आज दिनांक २८.०७.२०२० दुपारी एक वाजता नगरपरिषदेची छत्रपती शिवाजी राजे सभागृहात व्हीडिओ कॉन्फरन्सीद्वारे संपन्न झाली यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त हे वर्ष विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्याविषयी चर्चा करण्यात आली. त्यास मान्यता देण्यात आली.
यावेळी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी प्रस्ताव मांडला की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सरकारने भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा.
यासाठी इंदापूर नगर परिषदेच्या सर्व सदस्यांच्या वतीने इंदापूर शहरवासीयांच्या वतीने माननीय शासनास विनंती पत्र देणे येईल. यास सर्व सदस्यांनी मान्यता दिली.
शताब्दी वर्षाची सुरुवात एक ऑगस्ट रोजी 100 झाडे लावून करण्यात येणार आहे. लोकमान्य नगर येथे लवकरच ग्रंथालय सुरू करण्यात येणार आहे असे नगरसेवक भरत शहा यांनी सांगितले.हे ग्रंथालय सुसज्ज असे ग्रंथालय असावे म्हणून नगरपरिषद शासनास प्रस्ताव देखील पाठवणार आहे याबाबत राजश्री मखरे आणि दादासाहेब सोनवणे यांनी सूचना मांडली त्यावर याबाबत लवकरच शासनास प्रस्ताव पाठविण्यात येईल असे माननीय मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले. हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष साजरे करत असताना नगर परिषद जे कार्यक्रम राबवू शकते सर्व कार्यक्रम राबवावेत याबाबतची सूचना गटनेते गजानन गवळी यांनी केली.
या सभेस नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, गटनेते कैलास कदम, नगरसेवक गजानन गवळी, विरोधी पक्ष नेते पोपट शिंदे तसेच सर्व नगरसेवक हे उपस्थित होते. सभा अधीक्षक म्हणून गजानन पुंडे यांनी काम पाहिले.
टिप्पण्या