इंदापुर: विश्र्व प्रतिष्ठान इंदापूर संचलित जिजाऊ इन्स्टिट्यूट कालठण नंबर 1 ता इंदापूर जि. पुणे या स्कुलचा सलग चवथ्या वर्षी इयत्ता बारावी सायन्स,या शाखेतील फेब्रुवारी 2020 च्या परीक्षेत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नेत्र दिपक यश संपादन केले आहे असून विद्यालयाचा निकाल *100 %* टक्के लागला आहे. जिजाऊ स्कूलमध्ये पाचवीच्या वर्गात शिकत असलेली कु.श्रुती रविन्द्र जगताप या विद्यार्थ्यीनीला भारत सरकारच्यावतीने जवाहर नवोदय विद्यालय अंतर्गत घेतलेल्या फेब्र 2020 परिक्षेत उज्ज्वल यश मिळाले. अत्यल्प काळामध्ये जिजाऊ इन्स्टिट्यूट गुणवत्ता धारक दर्जेदार राहून एप्रिल 2019 पासून क्रॉप सायन्स साठी मान्यता मिळाली आहे.संस्थेच्या अध्यक्षा प्रा.डॉ.जयश्री गटकुळ यांनी
सर्व शिक्षकांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहरात जावे लागत परंतु जिजाऊ स्कुलमुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेता आले , गुणवत्ताधारक विद्यार्थ्याचं आयुष्य घडवून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कार्यरत राहणार आहे ग्रामीण आणि पुनर्वसित भागातील विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश पाहून खूप आनंद आणि अभिमान वाटत आहे* अशा शब्दात मत व्यक्त केले.संस्थेच्या अध्यक्षा प्रा.डॉ.जयश्री गटकुळ ,डॉ.भास्कर गटकुळ यांनी सर्व विद्यार्थ्याच्या यशाबद्दल कौतुक केले प्राचार्या राजश्री जगताप यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी अथक परिश्रम घेतले, शेखर साळवे, रेखा जगताप,सुहास शिंदे अर्चना शिदे प्रियांका देवकर आशिया शेख,सागर उंबरे, यांचे शैक्षणिक मार्गदर्शन मोलाचे लाभले
ऋगवेद धनाजी परेकर -प्रथम क्रमांक. प्रथमेश प्रविण बाबर-- द्वितीय क्रमांक. ऋतुजा सोमनाथ शिंदे - तृतीय क्रमांक
यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
टिप्पण्या