इंदापुरः जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित लाखेवाडी ता. इंदापूर येथील विद्यानिकेतन स्कूल अँड कॉलेजच्या विज्ञान शाखेमधील श्रद्धा राजेंद्र कवडे - देशमुख या विद्यार्थीनीने ९०.६१ टक्के प्राप्त गुणांसह प्रथम क्रमांक मिळवत. क्रॉप सायन्स या विषयामध्ये राज्यात पहिला येणाचा मान मिळवला असल्याचे संस्थेचे अध्यक्ष, माजी पुणे जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांनी सांगितले.
तसेच शैक्षणिक वर्ष २०१९-२० या वर्षातील इयता बारावीचा विज्ञान आणि वाणिज्य या दोन्हींही शाखांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
विज्ञान शाखेचा निकाल पुढीलप्रमाणे :
श्रध्दा कवडे-देशमुख ही ९०.६१ टक्के गुण मिळून प्रथम, पल्लवी अशोक नागटिळक हिने ८८.४६ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक तर प्राची अविनाश नांगरे हिने ८५.५३ टक्के गुण प्राप्त करत तृतीय क्रमांक मिळविला.
वाणिज्य शाखेचा निकाल पुढीलप्रमाणे :
गौरी तुकाराम चव्हाण ८२.०० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक, प्रसाद दत्तात्रेय वाघमोडे ७६.३० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक, तर प्राजक्ता कांतीलाल निंबाळकर ७५.२३ टक्के गुण प्राप्त करत तृतीय क्रमांक मिळवला.
श्रद्धा कवडे-देशमुख हिला भविष्यामध्ये प्रशासनामध्ये अधिकारी होण्याचे तिचे स्वप्नआहे. यावेळी तिने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देखील तिचे कौतुक केले आहे.
संस्थेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांनी कौतुक केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचाही संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे, मुख्य सल्लागार प्रदीप गुरव यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
यावेळी संस्थेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे प्रशासक गणेश पवार यांनी सर्वांचे आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विपुल वाघमोडे यांनी केले.
लेकीने मिळविलेल्या घवघवीत यशानंतर पित्याचे मन गहिवरले.....
"श्रध्दा कवडे-देशमुख हिचे वडील राजेंद्र कवडे-देशमुख उत्कृष्ट पत्रकार असून त्यांचे शिक्षण बी.एस.सी.अॅग्री झाले असून घरातुनच उत्कृष्ट संस्कार आणि वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन तिला मिळाले व त्या संधीचे श्रध्दाने आज सोने केल्याने पोरीने घवघवीत यश संपादन केल्याने पित्यास गहिवरून आले."
टिप्पण्या