इंदापूर तालुक्यातील जनसामान्यांचे नेतृत्व राजवर्धनदादा पाटील, संचालक नीरा-भीमा सह. सा. कारखाना मर्या. शाहजीनगर यांनी मौजे बावडा येथे आज रविवार दि. १९/०७/२०२० रोजी कोरोनाचा रुग्ण सापडल्यामुळे बावडा येथे जाऊन परिस्थितीचा पाहणी केली. दादांच्या सुचनेनुसार गावांमध्ये सॅनिटायझरची फवारणी केली. यावेळी बावडा गावचे प्रथम नागरीक किरण विलासराव (काका) पाटील सरपंच व पंचक्रोशीतील इतर मान्यवर उपस्थित होते. मा. राजवर्धनदादांनी, आपण घाबरून न जाता स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आव्हान उपस्थितीत नागरिकांना केले.
इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वहात होता. बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...
टिप्पण्या