इंदापूर: बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील ज्येष्ठ व गरजू नागरिकांना कोरोना पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हीटामिन सी व डी गोळ्यांचे वाटप जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गुरुवारी (दि.16) करण्यात आले.
वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. वयानुसार ती कमी होत जाते. कोरोना पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने रोगप्रतिकारक शक्तीवाढीच्या गोळ्या, व्हीटामिन सी व व्हीटामिन डी गोळ्यांचे वाटप बावडा येथे करण्यात आले.
संपूर्ण बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील ज्येष्ठ नागरिकांना व गरजूंना या गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात वाढत असलेला कोरोणा प्रादुर्भाव कमी होईल व कोरोणा वाढवण्याची शक्यता यामुळे कमी होईल.
यावेळी बावडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कपिल वाघमारे, सरपंच किरण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे आदी उपस्थित होते.
________________________________
टिप्पण्या