इंदापुर तालुक्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम 2020-21 ची तयारी जोरदारपणे सुरु केलेली असून त्या अनुषंगाने आज कारखान्याचे मिल रोलर पुजन कार्यक्रम कारखान्याचे अध्यक्ष व राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंञी मा.श्री. हर्षवर्धनजी पाटीलसाहेब तसेच कारखान्याच्या उपाध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले यांचे शुभहस्ते तसेच मा. संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
गाळप हंगाम वेळेत चालू होणेकरिता गाळप क्षमतेप्रमाणे ऊस तोडणी वाहतुकीसाठीचे टक-टॅक्टरचे आवश्यक असलेले करार कारखान्याने पूर्ण करणेत आलेची माहिती कारखान्याचे अध्यक्ष व राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंञी मा.श्री. हर्षवर्धनजी पाटीलसाहेब तसेच कारखान्याच्या उपाध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले यांनी दिली.
कर्मयोगी शंकररावजी पाटील सह. साखर कारखान्याने या गाळप हंगामामध्ये कार्यक्षेञामधील सभासदांच्या उपलब्ध ऊस क्षेञाची व शेतकी विभागाकडे नोंद झालेल्या ऊसक्षेञाची माहिती घेऊन 14 लाख मे.टन गाळपाचे उदिदष्ठ ठरविलेले असून ऊसतोडणी व वाहतुक यंञणा उभारणीचे काम जोमाने सुरु आहे. त्यानुसार टक व टॅक्टरचे 550 करार पूर्ण झालेले आहेत. तसेच बैलगाडी 700 व टॅक्टरगाडी 400 करार करणेचे काम सुरु असून ऊस वाहतुक कंञाटदारांना कारखान्याचे धोरणानुसार ऍ़डव्हान्स वाटपाचे काम सुरू आहे. त्यास तोडणी मुकादमांचा ही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळालेला आहे.
येणा-या गाळप हंगामासाठी गरज पडलेस कारखाना कार्यस्थळावर उपस्थित झालेल्या यंञणेसाठी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण यंञणेच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या द़ुष्टीने कारखान्याच्या वतीने संपुर्ण खबरदारी घेणेत येईल असे कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. बाजीराव सुतार यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक श्री. भरतशेठ शहा, श्री. यशवंत वाघ, श्री. राजेंद्र गायकवाड, श्री. राजेंद्र चोरमले, श्री. भास्कर गुरगुडे, श्री. सुभाष काळे, श्री. प्रशांत सुर्यवंशी, श्री. मानसिंग जगताप, श्री. मच्छिंद्र अभंग, श्री. विष्णू मोरे, श्री. अंबादास शिंगाडे, श्री. केशव दुर्गे, श्री. अतुल व्यवहारे, श्री. वसंत मोहोळकर, श्री. सुभाष भोसले, श्री. पांडुरंग गलांडे, कार्यकारी संचालक श्री.बाजीराव जी. सुतार, वर्क्स मॅनेजर श्री. ए.सी. पोरे, चीफ केमिस्ट श्री. यु.के. कांदे, तसेच मुख्य शेतकी अधिकारी श्री. एस.जी.कदम व सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते.
टिप्पण्या