इंंदापुर: लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांच्या ५१व्या स्मृती दिना निमित्त अभिवादन करण्या साठी इंदापुर शहरातील आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी इंंदापूर विचार मंथन परिवाराचे अॅडमीन, माजी उपनगराध्यक्ष अरविंद तात्या वाघ, शिवाजीराव मखरे पुणे जिल्हा आरपीआय संघटक,बाळासाहेब सरवदे कार्याध्यक्ष बारामती लोकसभा आर पी आय , संदिपान कडवळे आर पी आय अध्यक्ष, हणुमंत कांबळे शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडी,ललेंद्र शिंदे अध्यक्ष मातंग एकता आंदोलन, सामाजिक कार्यकर्ते माऊली नाचण,हमीदभाई आतार, नितीनराव आरडे,अशोकराव पोळ जिल्हा अध्यक्ष समता सैनिक दल, विशाल चव्हाण, अमोल मिसाळ,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.हा कार्यक्रम शासकीय नियमानुसार सोशल डिस्टंनस पाळून करण्यात आला आहे. यावेळी सॅनिटायझर व मास्कचा वापर करण्यात आला,
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या