इंदापुर:शहाजीनगर (ता.इंदापूर) येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याकडून आगामी गळीत हंगाम सन 1920-21 साठी ऊस तोडणी- वाहतुकीसाठी बैलगाडी व बजाट वाहनधारक व मुकादम यांना चेकचे वाटप कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते बुधवारी (दि.15) कारखाना कार्यस्थळावर करण्यात आले.यावेळी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे,संचालक दत्तात्रय शिर्के, प्र. कार्यकारी संचालक सुधीर गेंगे पाटील, शेतकी अधिकारी डि.एम.लिंबोरे आदी उपस्थित होते.
येत्या गळीत हंगामासाठी कारखान्यामधील मशिनरीची पूर्वहंगामी कामे प्रगतीपथावर आहेत.तसेच कारखान्याची ऊस तोडणी- वाहतूक यंत्रणा सज्ज झाली आहे. आगामी हंगामात कारखान्याकडून सुमारे 7 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केली जाईल,अशी माहिती संस्थापक हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
________________________________
टिप्पण्या