मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

आय कॉलेजच्या सृजनशीलतेतून साकारतोय ऑक्सीजन पार्क
    इंदापूर येथील आय कॉलेजच्या परिसरामध्ये  महाविद्यालयाने राबवलेल्या अनेक सृजनशील उपक्रमांतर्गत या परिसरात निसर्ग संवर्धनाचा महत्त्वाचा घटक असलेल्या ऑक्सीजन पार्कची निर्मिती झाली आहे.
      संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उपाध्‍यक्षा पद्मा भोसले, सचिव मुकुंद शहा, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सृजनशील उपक्रम महाविद्यालयात राबविले जातात.या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयाचा परिसर हा निसर्ग संवर्धनाचा महत्त्वाचा घटक व्हावा या हेतूने ऑक्सिजन पार्कची निर्मिती करण्यात आली आहे.
       याठिकाणी छोटी छोटी वने विकसित करण्यात आली असून या ऑक्सिजन पार्कमध्ये वड, पिंपळ, उंबर, अर्जुन सादडा ,सिसम,पुत्रंजीवी, हत्तीलिंग, बेल, बेहडा, हिरडा, कैलासपती, कडुनिंब, जाई, जुई ,मोगरा ,सायली, कृष्णकमळ, पारिजातक,रुई, गोकर्ण, सोनचाफा, हिरवा चाफा, पिवळा चाफा, गुलमोहर, निलमोहर, शंखासुर, चिंच, विलायती चिंच, काटेसावर, कण्हेर, चंपा,बॉटलपाम, नारळ,ऑरोकॅरिया यासारख्या वनस्पतींची लागवड याठिकाणी करण्यात आली आहे. श्री. नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट च्या शहा नर्सरी मधुन ही रोपे मोफत उपलब्ध झाली. 
      या ऑक्सिजन पार्कमध्ये चिमणी, मैना, दयाळ, साळुंखी, मुनिया, टीपकेवाली मुनिया, टिटवी, पानकावळा, कोरमोरंड, ब्राह्मणी घार,ताम्हण, घुबड ,ब्राह्मणी मैना, भारद्वाज, वटवाघुळ, पारवा, कबुतर, वेडाराघू,पोपट, बाया, सुगरण, सुतार, लालबुड्या, कोतवाल यासारखे अनेक पक्षी यांची मांदियाळी याठिकाणी वास्तव्यास आहे.तसेच विविध जातींची फुलपाखरे व पतंग आहेत.एकूण सात बागांमध्ये जैव विविधता जोपासत ऑक्सिजन पार्क ची निर्मिती झाली आहे. विद्यार्थी कल्याण मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रयत्नाने ऑक्सीजन पार्क झाला.
   महाविद्यालयामध्ये कोणत्याही कार्यक्रमामध्ये सन्मानीय पाहुण्यांचे स्वागत झाडाचे रोपटे देऊन केले जाते तसेच त्यांच्या हस्ते या पार्क मध्ये वृक्षारोपण करण्यात येते. संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वाढदिवसानिमित्त देखील वृक्षारोपण करून हा वाढदिवस साजरा केला जातो यातूनच हे पार्क विकसित झाले आहे.
  वेगवेगळ्या प्रकारची फूल, पक्षी आणि निसर्गरम्य वातावरण यामुळे हा परिसर महाविद्यालयाच्या सौंदर्यामध्ये भर घालत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते