मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

पनवेल पोलिसांची (फटाका) सायलेन्सर जप्ती.

 मुंबई प्रतिनिधी :(सतीश पाटील) पनवेलमध्ये बुलेटच्या सायलेन्सरमधून फटाक्यांसारखा आवाज काढून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या बाईकस्वारांवर पनवेल शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे, ज्यात अनेक अवैध सायलेन्सर जप्त करून ते रोडरोलरखाली चिरडण्यात आले, यामुळे नियमभंग करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे आणि वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी जागरूकता निर्माण झाली आहे.  कारवाईचे मुख्य मुद्दे: ध्वनिप्रदूषणविरोधी मोहीम: पनवेल पोलिसांनी ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी ही विशेष मोहीम राबवली आहे. अवैध सायलेन्सर जप्त: बुलेट आणि इतर दुचाकींवर लावलेले फटाक्यांसारखा आवाज करणारे (मॉडिफाइड) सायलेन्सर जप्त करण्यात आले. सायलेन्सर नष्ट: जप्त केलेले सायलेन्सर रोडरोलरखाली दाबून नष्ट करण्यात आले, जेणेकरून त्यांचा पुन्हा वापर करता येणार नाही. दंड आणि कायदेशीर कारवाई: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली गेली आणि सायलेन्सर बनवणाऱ्यांवरही कारवाईचा इशारा देण्यात आला. नागरिकांची मागणी: नागरिकांच्या तक्रारींनंतर ही कारवाई करण्यात आली, कारण अशा वाहनांमुळे खूप त्रास होत होता.  या कारवाईमुळे काय साध्य झाले? ...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान, संस्थेतील विद्यार्थिनीचे राष्ट्रीय पातळीवरील कुराश स्पर्धेत घवघवीत यश*

भारतीय शालेय खेळ महासंघ {SGFI} तसेच उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण विभाग, सहारनपूर(उत्तर प्रदेश),अंतर्गत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय शालेय पातळीवरील कुराश स्पर्धा डॉ.भीमराव आंबेडकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सहारनपूर (उत्तर प्रदेश)                         या ठिकाणी सुरू असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील कुराश स्पर्धेमध्ये भारतभरातून 20 राज्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून महाराष्ट्र राज्यचे प्रतिनिधित्व करत असलेली,  1) *कु.पै.अण्वि बालाजी गायकवाड हिने -24kg वजन गटात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत ब्रांझ मेडल (कांस्य पदक) मिळवले. विशेष बाब म्हणजे अन्वी बालाजी गायकवाड हिने एकाच वर्षात दोन राष्ट्रीय स्पर्धा जिंकून स्पर्धेत ब्रांझ मेडल तसेच ऑल इंडिया प्लेयरचा सन्मान मिळवला आहे*                              या नेत्रदीपक कामगिरी बद्दल संस्थेचे,*अध्यक्ष मा.श्रीमंतजी ढोले (सर)उपाध्यक्ष सौ.डॉ.चित्रलेखा ढोले मॅडम,सचिव श्री.हर्षवर्धनजी खाडे (मा...

इंदापूर तालुक्याचे भाग्य विधाते. .. एक शेतकरी पुत्र ते कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य..ना.दत्तामामा भरणे

वर्षपूर्ती च्या संध्येला एक मतदार म्हणून माझ्या आपल्या लोकप्रतिनिधींच्या कार्याचा आढावा  1) महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवा साठी आपण घेतलेला ऐतिहासिक कर्जमाफी चा निर्णय हा आपल्या कारकिर्दीतील एक मैलाचा दगड ठरेल मामा. 2.)2025 मध्ये कृषी मंत्री पदाचा पदभार सांभाळत असतानाच आती वृष्टी मुळे माझ्या शेतकरी कुटुंबाच कंबरडे मोडले असताना प्रसंगी गुडघाभर चिखलातून वाट काढत पायपीट करत मोटारसायकल वरून कोणता ही फौज फाटा बॉडी गार्ड न घेता हा शेतकरी पुत्र बळीराजाच्या शेताच्या बांधा वर जाऊन त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी म्हणून जीवाच रान करीत होता. 3.) क्रीडा मंत्री पदाचा पद भार हस्तांतरित करीत असताना शेवटच्या क्षणाला इंदापूर तालुक्यातील युवा शक्ती साठी अद्यावत क्रीडा संकुलासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी मंजूर करून घेतला.इंदापूर येथील तालुका क्रीडा संकुल येथे विविध कामे करण्यासाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाच्या माध्यमातून तब्बल ५५ कोटींचा निधी मंजूर...          ग्रामीण भागातील खेळाडूंना खेळाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे व राष्ट्रीय व आंतरराष्...

नीरा भीमा कारखान्याकडून दुसऱ्या पंधरवड्याचे ऊस बिल रु. 3101 प्रमाणे बँकेत जमा-सौ.भाग्यश्री पाटील

 इंदापूर  शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याकडून चालु सन 2025-26 च्या ऊस गळीत हंगामामध्ये गाळप झालेल्या दि. 16 ते 30 नोव्हेंबर या दुसऱ्या पंधरवड्याचा ऊस बिलाचा पहिला हप्ता हा विना कपात प्रती टन रु. 3101 प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सोमवारी (दि.15) जमा करण्यात आला आहे, अशी माहीती कारखान्याच्या अध्यक्षा सौ.भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.      नीरा भीमा कारखान्याचे संस्थापक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखान्याने उच्चांकी प्रति टन रु. 3101 प्रमाणे उचल देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार यापूर्वी दि. 1 ते 15 नोव्हेंबर या पंधरवड्यातील ऊस बिलाची रक्कम रु. 3101 प्रमाणे जमा करण्यात आली आहे. त्यानंतर आता दुसऱ्या पंधरवड्याची ऊस बिल रक्कम प्रति टन रु. 3101 प्रमाणे सोमवारी (दि. 15) बँकेत जमा करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. चालु ऊस गळीत हंगामामध्ये 7 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणेच्या दृष्टीने कारखान्याची यशस्वीपणे ...

जेष्ठ कीर्तनकार अशोक महाराज पवार पुरस्काराने सन्मानित

वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ वारकरी संप्रदायासह धार्मिक क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल अनुसया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सुकलवाडी ( ता. पुरंदर ) येथील जेष्ठ कीर्तनकार ह. भ. प. अशोक महाराज पवार यांना सांप्रदायिक तथा अध्यात्मिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सासवड येथे अनुसया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सांप्रदायिक तसेच धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ह. भ.प. अशोक महाराज पवार यांच्या कार्याची दखल घेऊनच अनुसया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या हस्ते त्यांना सांप्रदायिक तथा अध्यात्मिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या प्रसंगी अनुसया चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे यांसह भाजपचे गंगाराम जगदाळे संजय निगडे पिंटूशेठ जगदाळे संदीप कटके निखिल जगताप बाळासाहेब काळे गोरख मेमाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याकडून शेतकरी हितास सर्वोच्च प्राधान्य-हर्षवर्धन पाटील

- उच्चांकी रु. 3350 दराबद्दल हर्षवर्धन पाटील व बाबुराव बोत्रे पाटील यांचा सत्कार इंदापूर : प्रतिनिधी दि.12/12/25                                       कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना सहयोग ओंकार शुगर अँड डिस्टीलरी लि.कडून शेतकरी हितास सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. परिणामी, चालू गळीत हंगामामध्ये उच्चांकी रु. 3350 प्रति टन दर जाहीर करण्यात आला आहे. आता कारखान्याचा अडचणीचा काळ संपला असून, आगामी काळात कारखाना प्रत्येक वर्षी उच्चांकी ऊस दराची परंपरा कायम राखेल, असे गौरवोद्गार कारखान्याचे अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी (दि. 11) काढले.            महात्मा फुलेनगर (बिजवडी) ता. इंदापूर  येथे कारखाना कार्यस्थळावर आयोजित शेतकरी सभासद सुसंवाद कार्यक्रमामध्ये हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी उच्चांकी ऊस दर रु. 3350 दिलेबद्दल कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व ओंक...

लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे साहेब : जयंती विशेष

(दि. १२ डिसेंबर २०२५)*   आज दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री , गृहमंत्री, समाजभूषण, लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.  सामान्य कार्यकर्त्यांपासून राजकारणाच्या सर्वोच्च पदापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरला. विदर्भ–मराठवाडा–महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचा आवाज म्हणून ते नेहमीच ओळखले गेले. गोपीनाथ मुंडे साहेबांचे व्यक्तिमत्त्व जमिनीवरचे नेतृत्व, निर्णयक्षम वृत्ती, कार्यकर्त्यांशी जिव्हाळा आणि निर्धार यासाठी प्रसिद्ध होते. ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर, विद्यार्थी, महिलांचे प्रश्न त्यांनी सदैव अग्रक्रमाने हाताळले. जनता दरबार, घरदार मोहीम, साखळी उपोषणे अशा माध्यमातून त्यांनी जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला. ऊसतोड कामगारांच्या हालअपेष्टा आणि स्थलांतरित जीवनाची वेदना ओळखून त्यासाठी ठामपणे लढणारे नेते म्हणजे गोपीनाथ मुंडे. साखर पट्ट्यातील हजारो कामगारांचा आवाज बनवून त्यांनी मजूर दर, सुरक्षा, आरोग्य आणि सामाजिक संरक्षणासाठी सातत्याने संघर्ष केला. वंचितांची बाजू घेणारा नेता म्हणून ऊसतोड कामगार आणि गोप...

कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याचा रु. 3350 प्रमाणे ऊस दर - हर्षवर्धन पाटील -शेतकरी हितास सर्वोच्च प्राधान्य

इंदापूर : प्रतिनिधी दि.8/12/25 महात्मा फुलेनगर (बिजवडी) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना व सहयोग मा.बाबुराव बोत्रे पाटील चेअरमन ओंकार शुगर अँड डिस्टिलरीने चालु सन 2025-26 च्या गळीत हंगामामध्ये गाळपास येणाऱ्या उसाला प्रति टन रु. 3350 प्रमाणे उच्चांकी दर देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पहिला हप्ता रु. 3200/- प्रमाणे असून, उर्वरित रु. 150 प्रमाणे रक्कम शेतकऱ्यांना दिवाळीला अदा केली जाईल, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली. कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना उत्कृष्टपणे चालू असून आज अखेर कारखान्याने 1,65,000 मे. टन ऊसाचे गाळप पूर्ण केले आहे. कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याच्या माध्यमातून व ओंकार शुगरचा सहयोगातून सहकार टिकविण्याचा हा महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. या सहयोगातून सहकारातील शेतकरी, कामगार टिकवण्याचे काम यशस्वीपणे केले जात आहे. ओंकार शुगर ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांचे माध्यमातून प्रति टन रु. 3350 प्रमाणे उच्चांकी दर द...

दिव्यांगांच्या पदसुनिश्चितीसाठी तज्ज्ञ समितीची पुनर्रचना- सचिव तुकाराम मुंढे

* प्रक्रियेसाठी एकसमान कार्यपद्धती निश्चित *  मुंबई, दि. ०३ : दिव्यांग व्यक्तींना शासकीय, निमशासकीय सेवेत नियुक्ती आणि पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षणाचा कायदेशीर हक्क प्रभावीपणे मिळावा, यासाठी पदसुनिश्चिती प्रक्रियेसाठी एकसमान कार्यपद्धती (एसओपी) तयार केली आहे. पदसुनिश्चिती प्रक्रिया अधिक शास्त्रीय आणि पारदर्शक करण्याच्या हेतूने तज्ज्ञ समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो दिव्यांग उमेदवारांसाठी रोजगार, सर्व स्तरांवर समान संधी सुनिश्चित होण्यास मदत होणार असल्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले.     सचिव तुकाराम मुंढे म्हणाले, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पदसुनिश्चिती प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय, निमशासकीय संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच स्वायत्त संस्था आणि महामंडळांमधील मंजूर पदांचा सखोल आढावा घेऊन दिव्यांग व्यक्ती कोणत्या पदांवर कार्यक्षमतेने काम करू शकतील, हे ओळखणे आता बंधनकारक राहणार आहे. प्रत्येक मंत्रालयीन विभागात यासाठी तज्ज्ञांचा...

*आदर्श शिक्षक श्री. नानासाहेब सानप सर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व* वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन

  (*५० व्या वाढदिवसाच्या/ सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!*) *इंदापूर*: ज्ञानाची दीपशिखा पेटवणारे, विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला घडवणारे,मूल्यांचे संस्कार रुजवणारे आदर्श शिक्षक जेव्हा अर्ध शतकाचा टप्पा गाठतात तेव्हा तो क्षण खरोखरच अभिमान आणि प्रेरणादायी ठरतो. नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील एका खेडेगावात जन्मलेले सुपुत्र हे इंदापूर येथे सन १९९४ - ९५ या शैक्षणिक वर्षात इंदापूर येथील दिवंगत रत्नाकर मखरे (तात्या) यांच्या भिमाई आश्रमशाळेत शिक्षकपदी रुजू झाले. गेली ३१ वर्षापासून अध्यापनाचे कार्य अतिशय प्रामाणिकपणे करत आहे. त्याचबरोबर त्यांचा सामाजिक सलोखा देखील वाखाणण्याजोगा आहे. शिव, फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारधारेने प्रेरित होऊन शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात स्वतः ला अविरतपणे झोकून दिले आहे. सानप सरांनी दिवंगत रत्नाकर (तात्या) मखरे, लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि संत भगवान बाबा यांना आदर्श मानून आपल्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यास प्रारंभ केला.सामाजिक बांधिलकी जपणारे सानप सर यांनी आपल्या वर्तणुकीतून व कार्यातून जनमानसात आपलं वेगळं स्थान निर्माण केल...

निरा भिमा करखान्याचे 7 लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणेसाठी सहकार्य करावे -हर्षवर्धन पाटील यांचे आवाहन

• संस्थापक हर्षवर्धन पाटील व अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांचा रु. 3101 उच्चांकी उचलीबद्दल सत्कार  इंदापूर :                                  नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने चालु सन 2025-26 च्या रौप्यमहोत्सव गळीत हंगामामध्ये प्रति टन रु. 3101 प्रमाणे उच्चांकी उचल ही विना कपात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शुक्रवारी जमा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना अधिकच्या ऊस दरासाठी चालू हंगामामध्ये 7 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशी आवाहन कारखान्याचे संस्थापक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि. 5) केले.          शहाजीनगर (ता. इंदापूर) येथे नीरा भीमा कारखाना कार्यस्थळावर शेतकऱ्यांशी संवाद कार्यक्रमांमध्ये हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी कारखान्याच्या इतिहासामध्ये प्रथमच उच्चांकी अशी प्रति टन रु. 3101 प्रमाणे उचल जाहीर केलेबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त ...

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

नीरा भीमा कारखान्याची उच्चांकी रु. 3101 प्रमाणे उचल - सौ.भाग्यश्री पाटील

 इंदापूर:- शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने रौप्यमहोत्सवी चालु सन 2025-26 च्या ऊस गळीत हंगामामध्ये गाळपास येणाऱ्या उसाला प्रति टन रु. 3101 प्रमाणे उच्चांकी उचल देण्याचा निर्णय घेतला आहे. सदरची ऊस बिलाची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शुक्रवारी (दि. 5) जमा केली जाईल, अशी माहिती कारखान्याच्या अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील यांनी गुरुवारी (दि.4) दिली.         नीरा भीमा कारखान्याचे संस्थापक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखान्याच्या इतिहासामध्ये प्रथमच उच्चांकी अशी प्रति टन रु. 3101 प्रमाणे उचल जाहीर केलेबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. कारखान्याचा चालु गळीत हंगाम उत्कृष्टपणे चालू असून, आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कारखान्याने मंगळवारी (दि. 2) एका दिवसात 6400 मे. टन ऊसाचे गाळप करून नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. चालु 25 व्या ऊस गळीत हंगामामध्ये सुमारे 7 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणेच्या दृष्ट...

शिक्षण रत्न पुरस्काराने बरकडे दाम्पत्य सन्मानित

वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ  शैक्षणिक क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राजेंद्र बरकडे व त्यांच्या पत्नी सविता राजेंद्र बरकडे यांना "शिक्षण रत्न" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुण्यातील हिंजवडी येथे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीने संविधान अमृत वर्षानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात पुरंदर तालुक्यातील विशेषतःनीरा कोळविहिरे गटात वास्तव्यास असणाऱ्या डोंबारी समाजासह पारधी ऊस तोड कामगार तसेच नंदीवाला समाजातील असंख्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी राजेंद्र बरकडे व त्यांच्या पत्नी सविता राजेंद्र बरकडे यांचे खूप मोठे योगदान असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेऊनच काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते बरकडे दाम्पत्यास "शिक्षण रत्न" २०२५ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या प्रसंगी पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष कैलास कदम प़देश सरचिटणीस यशराज पारखी या...

वाल्हेत जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा

वाल्हे प्रतिनिधी - सिकंदर नदाफ   दिव्यांगाप्रती समाजामध्ये स्नेहभाव वाढीस लागावा तसेच समाजातील एक उपयुक्त घटक म्हणून पुढे येण्यास त्यांना प्रेरणा मिळावी या उदात्त हेतूने वाल्हे ( ता. पुरंदर ) ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांचा सत्कार करून त्यांना स्थानिक ग्रामपंचायतीच्या वार्षिक उत्पन्नातून ५℅ निधीचे वाटप करण्यात आले.  या दरम्यान माजी आमदार संजय जगताप म्हणाले, दीर्घकालीन शारीरिक मानसिक तसेच बौद्धिक दुर्बलतेवर एक प्रकारे मात करून यशस्वीरित्या जीवन जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या दिव्यांग बांधवांचा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे. तसेच शासन स्तरावर दिव्यांगांसाठी विविध कल्याणकारी योजना कार्यान्वित असून दिव्यांग बांधवांना अशा योजनांचा सुलभतेने लाभ घेता यावा यासाठी शर्तीचे प्रयत्न देखील करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  याप्रसंगी वाल्हे गावचे सरपंच अतुल गायकवाड उपसरपंच सागर भुजबळ भाजपचे सचिन लंबाते माजी सभापती गिरीश पवार यांसह दत्तात्रय प...

वाल्हेत जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा

वाल्हे प्रतिनिधी - सिकंदर नदाफ   दिव्यांगाप्रती समाजामध्ये स्नेहभाव वाढीस लागावा तसेच समाजातील एक उपयुक्त घटक म्हणून पुढे येण्यास त्यांना प्रेरणा मिळावी या उदात्त हेतूने वाल्हे ( ता. पुरंदर ) ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांचा सत्कार करून त्यांना स्थानिक ग्रामपंचायतीच्या वार्षिक उत्पन्नातून ५℅ निधीचे वाटप करण्यात आले.  या दरम्यान माजी आमदार संजय जगताप म्हणाले, दीर्घकालीन शारीरिक मानसिक तसेच बौद्धिक दुर्बलतेवर एक प्रकारे मात करून यशस्वीरित्या जीवन जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या दिव्यांग बांधवांचा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे. तसेच शासन स्तरावर दिव्यांगांसाठी विविध कल्याणकारी योजना कार्यान्वित असून दिव्यांग बांधवांना अशा योजनांचा सुलभतेने लाभ घेता यावा यासाठी शर्तीचे प्रयत्न देखील करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  याप्रसंगी वाल्हे गावचे सरपंच अतुल गायकवाड उपसरपंच सागर भुजबळ भाजपचे सचिन लंबाते माजी सभापती गिरीश पवार यांसह दत्तात्रय पवार महादेव च...

*नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या मतदानाच्या दिवशी प्रचाराच्या जाहिरातींना बंदी*

1 डिसेंबरला रात्री 10 वाजता प्रचाराची समाप्ती मुंबई, दि. 30 (रानिआ): नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या जाहीर प्रचाराची समाप्ती 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजता होणार असून, त्यानंतर प्रचाराच्या कुठल्याच जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत. त्यामुळे मतदानाच्या दिवशी म्हणजे 2 डिसेंबर 2025 रोजी मुद्रित माध्यमांतदेखील जाहिराती प्रसिद्ध करू नयेत, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.  नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होत असून, त्यासाठीच्या जाहीर प्रचाराची मुदत ‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965’ मधील तरतुदीनुसार 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजता संपेल. त्यानंतर प्रचारसभा, प्रचारफेऱ्या, ध्वनिक्षेपक इत्यादींसह अन्य प्रकारे जाहीर प्रचार करता येणार नाही.  राज्य निवडणूक आयोगाने 9 ऑक्टोबर 2025 रोजी ‘निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रामाणन आदेश, 2025’ प्रसिद्ध केला आहे. या आदेशाच्या भाग आठमधील परिच्छेद 16 अन्वये नगरपरिषद व नगरपंचा...

सिटी इंडिया मराठी न्यूज व सिटी फाउंडेशन तर्फे दिला जाणारा जिल्हास्तरीय पुरस्कार अनिताताई खरात यांना प्रधान

पुणे जिल्ह्यातून सिटी फाउंडेशन व सिटी इंडिया मराठी न्यूज यांच्यातर्फे दरवर्षी ज्येष्ठ गीतकार व गायक आप्पा पांचाळ यांच्या वाढदिवसानिमित्त दिला जाणारा जिल्हास्तरीय पुरस्कार यावर्षी इंदापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या सौ.अनिताताई नानासाहेब खरात यांना प्रदान करण्यात आला, सामाजिक शैक्षणिक गोरगरिबांना शेतकऱ्यांना महिलांना व युवकांना प्रत्येक वेळी पुढे होऊन मदत करणारी व्यक्ती म्हणजे अनिताताई खरात या असून आम्ही सर्वे करत असताना त्यांचं नाव प्रकर्षाने पुढे आले त्या दृष्टीने आम्ही त्यांना हा जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान करत आहोत असे सिटी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले .  पुणे येथे सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन अनिताताई खरात यांचा गौरव करण्यात आला, यावेळी तुकाराम सुतार ,विष्णू कुमार देशपांडे ,आप्पा पांचाळ, ॲड नितीन कदम तसेच अनेक क्षेत्रातील मान्यवर , कलाकार उपस्थित होते.     पुरस्कारला उत्तर देताना अनिताताई म्हणाल्या की सिटी फाउंडेशन व सिटी इंडिया न्यूज यांनी जिल्ह्यातून जो माझ्यावर विश्वा...

नव दांपत्यानी इंदापूरकरांना केले मतदान करण्याचे आव्हान

इंदापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक समावेशक सुलभ आणि सहभागी करण्यासाठी स्वीप ( SVEEP ) अंतर्गत इंदापूर नगर परिषदेतर्फे व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. सदर अभियानांतर्गत डॉक्टर शुभम गाडेकर व डॉक्टर भाग्य श्री. चव्हाण कुटुंबाच्या लग्न समारंभाप्रसंगी नवदापत्त्याने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून इंदापूर शहरातील सर्व मतदारांना मतदान करण्याचे केले आव्हान . नागरिकांनी नैतिकरित्या, निर्भीडपणे आपल्या मतदानाच्या अमूल्य अधिकाराचा वापर करून मतदान करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी श्री सुधाकर मागाडे , सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री रमेश ढगे यांनी केले त्यावेळी उपस्थित कर्मचारी मनोज भापकर अल्ताफ पठाण प्रसाद देशमुख, सुरेश सोनवणे, या सर्वांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबवण्यात आला.

वाल्ह्यात संविधान दिन उत्साहात साजरा

वाल्हे प्रतिनिधी - सिकंदर नदाफ वाल्हे (ता. पुरंदर ) ग्रामपंचायतीच्या वतीने भारतीय राज्यघटनेचा (संविधान) वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी वाल्हे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात नवनिर्वाचित उपसरपंच सागर भुजबळ यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधान पुस्तकाचे पूजन तसेच संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.तसेच २६/११ मधील शहिदांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली.  याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी अनिल हिरासकर माजी उपसरपंच अमित पवार सम्राज्ञी लंबाते यांसह तंटामुक्तीचे अध्यक्ष जयवंत भुजबळ प्रहार संघटनेचे वाल्हे शाखाध्यक्ष निलेश कुदळे, ग्रामपंचायत सदस्य कविता पवार वैशाली पवार शीतल मदने प्रमिला पवार आदी मान्यवर उपस्थित होते.