*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान, संस्थेतील विद्यार्थिनींचे राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धेत घवघवीत यश*
इंदापूर:-भारतीय युवा खेल परिषद अंतर्गत, घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील लेदर क्रिकेट बॉल पेडम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मापसा गोवा या ठिकाणी दिनांक 20-01-2026 ते 23-01-2026 या दरम्यान संपन्न झाल्या यामध्ये विविध राज्यतील संघानी सहभाग नोंदवला असून महाराष्ट्रतील पुणे जिल्ह्याचे नेतृत्व करत *विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी* च्या संघाने प्रथम
क्रमांक तसेच *विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज& प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल वयोगट 14 वर्षाखालील मुलींनी सुद्धा प्रथम क्रमांक मिळवला* JBVP ,च्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही मुलींचे संघ विजयी झाले 2025 वर्ष भारतीय महिला क्रिकेट ने तसेच 2026 वर्ष JBVP च्या मुलींनी खरोखरच गाजवुन दाखवले.
या नेत्रदीपक मिळवलेल्या यशाबद्दल व कामगिरी बद्दल संस्थेचे,*अध्यक्ष मा.श्रीमंत ढोले,उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले,सचिव हर्षवर्धन खाडे ,मुख्य सल्लागार प्रदिप गुरव ,विद्या निकेतन स्कूल अॅण्ड जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार ,प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल चे प्राचार्य राजेंद्र सरगर, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी चे सम्राट खेडकर यांनी अभिनंदन केले.तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे क्रिडा विभाग प्रमुख शिवराज तलवारे, महिला कोच शीतल तलवारे ,अविनाश कोकाटे कोच, यांचे मार्गदर्शन लाभले यांचेही संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यातआल्या.*
टिप्पण्या