इंदापूर:- आपल्या इंदापूर नगरपरिषदेचे गेल्या अनेक वर्षापासुन काम करत आहेत. आम्ही कॉट्रक्ट बेसवर काम करत असुन मागील १५ वर्षापासुन आम्ही परमनंट होण्याची वाट पाहत आहोत. ऐवढी वर्ष प्रमाणीक पणे काम केले आहे हे सर्वानी पाहिलेले आहे. इंदापूर नगरपरिषदेला मिळालेल्या स्वच्छतेच्या पुरस्कारामध्ये आमचे योगदान अतुलनिय आहे. इंदापूरच्या स्वच्छतेसाठी आम्ही फार कष्ट घेतले आहेत. वाढत्या महागाईमुळे सदर कॉट्रक्ट बेसवर मिळणा-या पगारामध्ये आमचे घरखर्च भागत नाही. त्यामुळे आम्हाला कायम करण्याची कार्यवाही होईपर्यंत प्रतिदिवस ५०० रूपये या प्रमाणे पगार मिळावा अशी आमची मागणी आहे. आम्हाला इंदापूर नगरपरिषदेमध्ये कायम करून येथुन पुढे अखंडीत आपली सेवा करण्याची संधी द्यावी आसे निवेदन . मा.मुख्यमंत्री साो. महाराष्ट्र राज्य, मा. उपमुख्यमंत्री साो. महाराष्ट्र राज्य,मा. दत्तात्रय भरणे साो. कृषीमंत्री महाराष्ट्र राज्य,मा. भरतशेठ शहा, नगराध्यक्ष इंदापूर नगरपालिका यांना देण्यात आले,या निवेदनावर एकूण तीस कामगारांच्या सह्या आहेत, हे निवेदन मुख्याधिकारी यांच्यानावाने देण्यात आले आहे.
इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वहात होता. बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...
टिप्पण्या