इंदापूर येथील भिमाई आश्रमशाळेत ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित
प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक आश्रमशाळा,मुलांचे आणि मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात भिमाई आश्रमशाळेचे मुख्याध्यापक साहेबराव पवार यांच्या हस्ते ध्वजपूजन तर प्राथमिक आश्रमशाळेचे ज्येष्ठ कर्मचारी प्रकाश श्रीराम बोरकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाने सुरुवात झाली. ध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत सादर करण्यात आले.
यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं, संविधान वाचन,संगीत कवायत,प्रेरणादायी भाषणं व संगीत खुर्ची खेळाच्या माध्यमातून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून देशप्रेम, एकता आणि संविधानाचे महत्त्व अधोरेखित झाले. संस्थेचे सचिव ॲड.समीर मखरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत भारतीय संविधानातील मूल्ये अंगीकारण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे (काकी), उपाध्यक्ष तानाजी मिसाळ, संचालक गोरख तिकोटे, राहुल सवणे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीभाऊ चंदनशिवे, गोरख चौगुले, परमेश्वर मखरे, सुरज धाईंजे तसेच प्राचार्या अनिता साळवे, अधिक्षक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले तर संगीत कवायत हिरालाल चंदनशिवे यांनी घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. भिमाई आश्रमशाळेतील प्रजासत्ताक दिनाचा सोहळा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.
टिप्पण्या