इंदापूर तालुक्याचे भाग्य विधाते. .. एक शेतकरी पुत्र ते कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य..ना.दत्तामामा भरणे
1) महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवा साठी आपण घेतलेला ऐतिहासिक कर्जमाफी चा निर्णय हा आपल्या कारकिर्दीतील एक मैलाचा दगड ठरेल मामा.
2.)2025 मध्ये कृषी मंत्री पदाचा पदभार सांभाळत असतानाच आती वृष्टी मुळे माझ्या शेतकरी कुटुंबाच कंबरडे मोडले असताना प्रसंगी गुडघाभर चिखलातून वाट काढत पायपीट करत मोटारसायकल वरून कोणता ही फौज फाटा बॉडी गार्ड न घेता हा शेतकरी पुत्र बळीराजाच्या शेताच्या बांधा वर जाऊन त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी म्हणून जीवाच रान करीत होता.
3.) क्रीडा मंत्री पदाचा पद भार हस्तांतरित करीत असताना शेवटच्या क्षणाला इंदापूर तालुक्यातील युवा शक्ती साठी अद्यावत क्रीडा संकुलासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी मंजूर करून घेतला.इंदापूर येथील तालुका क्रीडा संकुल येथे विविध कामे करण्यासाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाच्या माध्यमातून तब्बल ५५ कोटींचा निधी मंजूर...
ग्रामीण भागातील खेळाडूंना खेळाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करणे हा शासनाचा प्रमुख उद्देश आहे. सद्यस्थितीत इंदापूर येथे क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात आलेली आहे. परंतु खेळाडूंच्या व नागरिकांच्या मागणीनुसार अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्याकरिता सध्याच्या प्रचलित संकुलामध्ये ५५ कोटी रुपयांच्या क्रीडा सुविधा उभा करण्याकरिता शासनाने नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल ग्रास मैदान,व्हॉलीबॉल कोर्ट सिंथेटिक, विविध खेळांचे इनडोअर हॉल,फ्लड्स लाइट्स, मुले व मुलींकरिता स्वतंत्र वस्तीग्रह, अंतर्गत रस्ते,अद्यावत व्यायाम शाळा साहित्यसह स्वतंत्र बॅडमिंटन हॉल, ट्रॅकच्या दोन्ही बाजूस पवेलियन, सुंदर असे लँडस्केपिंग, पाणीपुरवठा व सोलर, अद्यावत शूटिंग रेंज, स्क्वॉश कोर्ट, क्लब हाऊस, व्हीआयपी कॉन्फरन्स हॉल आदी क्रीडा सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे.
4)MIDC.. जंक्शन वालचंदनगर परिसरात MiDC मंजूर करून तालुक्यातील तरुण व्यावसायिका साठी रोजगार निर्मितीच आएतिहासिक कार्य केलं.
5.)उजनी बॅक वॉटर शिरसावडी ते कुगाव या पुलाचे काम sanction करून इंदापुरातील व्यापाऱ्यांना बाजारपेठ वाढी साठी नवीन संधी निर्माण केली. इंदापूर बाजारपेठेत नव चैतन्य निर्माण केलं.
6.)इंदापूर येथे बागवान समाज शादीखाना इ इमारतीसाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या शादीखानामुळे मुस्लिम बांधवांसह सर्व समाजबांधवांना सोयीसुविधांनी युक्त आणि प्रशस्त असे स्थळ उपलब्ध होणार आहे. समाजाच्या प्रगतीसाठी आणि ऐक्याबद्धतेसाठी अशा उपक्रमांची गरज असून, ही स्थळं निश्चितच सर्वांसाठी उपयुक्त ठरेल.
7)१९-११-२०२५ पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता वितरीत…महाराष्ट्रातील ९० लाखांहून अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यात आज ₹१,८०८ कोटी २५ लाख इतकी रक्कम थेट जमा झाली.
शेती विकास आणि शेतकऱ्यांचे सक्षमीकरण यासाठीचा हा महत्त्वपूर्ण टप्पा.
8.)इंदापूरमध्ये सुरु होणार राज्यातील पहिले प्रगत मत्स्य महाविद्यालय
ऑक्टोबर 2025 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील मत्स्य व्यवसायाच्या प्रगतीसाठी आणि शाश्वत जलउत्पादन व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यात नवीन मत्स्य महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात असून याबाबत तपशील माहिती उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवार यांनी घेतली. तसेच, महाविद्यालयासाठी आवश्यक जमीन, बांधकाम आराखडा आणि निधी नियोजनाबाबत प्राथमिक अहवाल सादर करण्यात आल इंदापूर तालुक्यात स्थापन होणारे मत्स्य महाविद्यालय हे राज्यातील पहिले तंत्रज्ञानाधारित मत्स्य शिक्षण “शौर्याला सुरक्षिततेची साथ!”
*इंदापूर तालुक्यात ५१ अनुदानित ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित ८ यंत्र आणि औजारांचे वितरण!*
ऑक्टोबर 2025
दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आज पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ५१ अनुदानित ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरचलित ८ यंत्र व औजारांचे वितरण केलं. तालुक्यातील एकूण २३,५९७ लाभार्थी शेतकऱ्यांची निवड या योजनेत करण्यात आली आहे.
10).July इंदापूर शहरातून महाराष्ट्रभर दही हंडी फोडायला जाणाऱ्या गोविंदा पथकानं
येणाऱ्या संरक्षणात्मक मॅट्सचे वाटप करण्यात आले.
गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेला हा महत्त्वपूर्ण टप्पा त्यांच्या सरावाला अधिक सुलभ व निर्धास्त बनवेल,
दहीहंडी ही महाराष्ट्राची परंपरा आणि शौर्याची ओळख असून, गोविंदांचा उत्साह अबाधित राहावा आणि कोणतीही दुखापत होऊ नये, यासाठी ही सुरक्षा मॅट्स उपयोगी ठरतील.
11.)इंदापूरचे सांस्कृतिक ओळख असलेल्या हिंदू मुस्लिम आयुक्याचे प्रतीक असणाऱ्या वीरश्री मालोजी राजे भोसले यांची फत्ते मंगल गढी आणि हजरत चांद शाह वल्ली दर्ग्याच्या जीर्णोध्दार aani सुशोभीकरणाचे काम निधी देऊन सुरू केले
अशा विकास कामाच्या गगन भरारी मुळेच मामा आमचे सर्वं सामान्य गोरगरिबांचे लाडके मंत्री आहेत.
आपला स्वाभिमानी कार्यकर्ता
प्रशांत उषा भानुदास शिताप
टिप्पण्या