इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर संचलित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा, मुलांचे आणि मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात वार्षिक स्नेहसंमेलन -२०२६ चे आयोजन करण्यात आले.आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी (दि.१६) शुक्रवारी सायंकाळी ८:०० वाजता कार्यक्रमास आरंभ झाला.या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री.गोपीचंद गलांडे (माजी सरपंच, गलांडवाडी २) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तथागत गौतम बुद्ध, जिजाऊ माँसाहेब, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, माता भिमाई, माता रमाई, माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर (तात्या)मखरे यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वागत गीताने करण्यात आली.मुख्याध्यापक साहेबराव पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं, नृत्यनाट्य, लोकनृत्य,लावण्या, कोळी गीतं,एकांकिका,भारुड व समूहगीतांसह विविध मराठी, हिंदी व कन्नड भाषेतील गीतांवर अफलातून एक से बढकर एक नृत्य सादर करुन मायबाप रसिकांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून सामाजिक संदेश,संस्कृतीसह वास्तवतेचे दर्शन घडले.
यावेळी मायबाप रसिकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद देत कौतुकाची थाप देऊन रोख बक्षिसांचा वर्षाव केला.
कार्यक्रमास अविनाश कोतमिरे, राजाभाऊ गायकवाड, सुहास मखरे, सुहास राऊत, परमेश्वर मखरे, आझाद सय्यद, नानासाहेब चव्हाण, तेजस मखरे, लक्ष्मण जाधव, अतुल सोनकांबळे, सागर शिंदे, सिद्धार्थ मखरे,आशा गलांडे, रंजना शिंदे, विद्या शिंदे, संगीता गोडसे,उषा भोई तसेच संस्थेच्या अध्यक्ष शकुंतला (काकी) मखरे, सचिव ॲड, समीर मखरे, संचालक अस्मिता मखरे ,पालक, रसिक श्रोते, विद्यार्थी, अधिक्षक,शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी आदी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी तर आभार हिरालाल चंदनशिवे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्या अनिता साळवे, मुख्याध्यापक साहेबराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक्षक, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. संपूर्ण स्नेहसंमेलन आनंदी, उत्साही वातावरणात यशस्वीपणे पार पडले.
टिप्पण्या