देशातील युवा पिढी व्यसनमुक्त व सामर्थ्यवान बनावी या उदात्त हेतूने जेष्ठ किर्तनकार युवक मित्र ह.भ.प.बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने सलग १५व्या वर्षी विधायक ३१ डिसेंबर-दारू नको दूध प्या हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी इंदापूर शहर आणि परिसरातील गलांडवाडी, वरकुटे,वडापुरी, नरुटवाडी त्याच बरोबर इतर गावातील ५५० युवक व नागरीकांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांना लोणी देवकर येथील रचना देशी गो संवर्धन केंद्र यांच्या वतीने मोफत सुगंधी दुधाचे वाटप करण्यात आले तसेच गलांडवाडी नं१येथील राजीवप्रताप निसर्गोपचार केंद्राचे संचालक प्रताप कदम यांच्या वतीने व्यसनमुक्त युवक संघाची शिवतेज दिनदर्शिका मान्यवरांना भेट देण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष इंदापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष भरत शेठ शहा म्हणाले 'घरातील, समाजातील ज्येष्ठांचे अनुकरण करत शालेय मुलंही व्यसनाच्या आहारी जात आहेत म्हणून शालेय जीवनात विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. कोणत्याही देशाची युवा पिढी जितकी सशक्त बलशाली असेल तितका तो देश सामर्थ्यवान आणि बलशाली मानला जातो. परंतु भारत मातेच्या युवकांमध्ये पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करत ३१ डिसेंबरला नववर्ष साजरे करण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी दारू पिण्याचे प्रमाण वाढत चाललेले आहे.
या वेळी शालेय शिक्षण आणि योग क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या योग रत्न पुरस्कार प्राप्त श्री दत्तात्रय आनपट, विजय नवल पाटील राज्यस्तरीय शालेय शिक्षक योगासन स्पर्धेसाठी निवड झालेले प्रशांत गीड्डे व प्रा.धनंजय देशमुख यांचा तसेच इंदापूर नगर परिषदेच्या नवानिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सिद्धार्थ नामपल्ली. गोविंद वृद्धाश्रमाचे दशरथ बुवा महाडिक .भारतीय जैन संघटनेचे धर्मचंद लोढा.माजी सैनिक संघटनेचे मारुती मारकड, कैलास गवळी ,वृक्ष संजीवनी परिवाराच्या सायरा आतार मयुराताई पाटील सारिका रेडके,रचना परिवाराचे माजिद भाई पठाण , व्यसनमुक्त युवक संघाचे सुदीप ओहोळ,तानाजी पांडुळे, बापू गलांडे,माजी मुख्याध्यापक नवनाथ चंदनशिवे आधी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अस्लम शेख,गणेश कांबळे ज्ञानदेव डोंगरे,इंद्रनील देशमुख मंथन माने, सौरव पारवे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.धनंजय देशमुख यांनी तर सूत्रसंचालन शरद झोळ व मान्यवर आणि उपस्थितांचे आभार युवा क्रांती प्रतिष्ठानचे प्रशांत शिताप यांनी मानले.
टिप्पण्या