*बाजार समितीचे मुख्य बाजार इंदापूर येथे हमीभाव (आधारभुत दरात) शासकीय मका खरेदी केंद्राचे उद्घाटन PDCC बँकेचे संचालक तथा बाजार समितीचे संचालक मा.श्री. आप्पासाहेब जगदाळे यांच्या हस्ते राज्याचे कृषिमंत्री मा.श्री. दत्तात्रय(मामा) भरणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.* शासकीय हमीभाव दरात मका शेतमाल विक्रीसाठी ऑनलाईन 419 शेतकऱ्यांनी 10086 क्विंटलची नोंद केलेली आहे. अशी माहिती बाजार समितीचे सभापती श्री. तुषार जाधव, उपसभापती श्री. मनोहर ढुके यांनी दिली.
हमीभाव दरात मका विक्रीसाठी नोंदणी दि. 31/12/2025 पर्यंत करणेत यावी. इंदापूर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी मका शेतमाल हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन इंदापूर बाजार समितीचे सभापती श्री. तुषार जाधव, उपसभापती श्री. मनोहर ढुके, माजी सभापती मा. आप्पासाहेब जगदाळे यांनी केलेले आहे. यावेळी संचालक माजी आमदार श्री. यशवंत(तात्या) माने, श्री. विलासराव माने, श्री. दत्तात्रय फडतरे, श्री. मधुकर भरणे, श्री. रोहित मोहोळकर, श्री. संग्रामसिंह निंबाळकर, श्री. संदिप पाटील, सौ. रुपालीताई संतोष वाबळे, सौ. मंगलताई गणेशकुमार झगडे, श्री. आबा देवकाते, श्री. संतोष गायकवाड, श्री. अनिल बागल, श्री. दशरथ पोळ, श्री. रोनक बोरा, श्री. सुभाष दिवसे, इंदापूर नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री. भरतशेठ शहा, श्री. रविंद्र सरडे, सहाय्यक निबंधक श्री. बी.के. शिवरकर, तहसिल व कृषी विभागाचे अधिकारी व प्र. सचिव श्री. संतोष देवकर उपस्थित होते.
टिप्पण्या