इंदापूर ( जिल्हा पुणे ) येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राधिका शहा यांचे निधन होण्यापूर्वी त्यांच्या इच्छेनुसार पती डॉ. संदेश शहा व शहा परिवाराने अवयवदान केल्याने सहा जणांना जीवदान मिळाले. आपले दुःख बाजूस ठेवून दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा सासर व माहेरच्या शहा परिवाराचा उपक्रम आदर्श व अनुकरणीय आहे असे प्रतिपादन वालचंदनगर येथील सन्मती मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ. विकास शहा यांनी केले.
वालचंदनगर सन्मती मंडळाच्या वतीने डॉ. राधिका शहा यांच्या मरणोत्तर अवयवदाना बद्दल त्यांचे पती डॉ. संदेश शहा, मोठे दीर, जनरल सर्जन डॉ. श्रेणिक शहा यांच्याकडे सन्मान पत्र देऊन शहा परिवाराचा गौरव करण्यात आला. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. सशांत गांधी, युवा अध्यक्ष डॉ. चिराग गांधी, महिला अध्यक्ष डॉ. निकिता
दोभाडा, सचिव सारिका गांधी, महाराष्ट्र राज्य नोटरी प्रॅक्टिशनर असोसिएशन चे नूतन तालुकाध्यक्ष ॲड वैभव गांधी, सौ. संगीता श्रेणिक शहा उपस्थित होते.
डॉ. विकास शहा पुढे म्हणाले, मरणोत्तर अवयवदान हे मानव जातीसाठी सर्वश्रेष्ठ दान आहे. तो सामाजिक बांधिलकीचा आदर्श वस्तुपाठ असून त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात देखील संशोधनास वाव आहे. मरावे परी कीर्तीरूपी उरावे, जगा व जगू द्या, जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला या उक्तीप्रमाणे त्यांचे जीवन सार्थक झाले आहे. त्यांचा आदर्श सर्वांनी घेणे ही काळाची गरज आहे.
दरम्यान कामधेनू परिवाराचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मणराव आसबे, हभप उमराव महाराज देवकर, हुमड जैन फेडरेशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, नगराध्यक्ष भरत शहा, माजी नगराध्यक्षा सौ. अंकिता मुकुंद शहा, माजी नगराध्यक्ष प्रदीप गारटकर, युवा नेते श्रीराज भरणे, नागरी संघर्ष समितीचे संस्थापक कृष्णाजी ताटे, जेष्ठ पत्रकार तानाजी काळे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे तैय्यब शेख, अमोल भिसे, राष्ट्र सेवा दलाचे गफूरभाई सय्यद, माजी गट नेते कैलास कदम, इंदापूर सकाळ तनिष्का प्रमुख सारिका पवार, भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेचे प्रदेश नेते तानाजी धोत्रे आदींनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी मधुकर भरणे, अशोक इजगुडे, सुधीर पाटील, अरविंद वाघ, श्रीनिवास कोरटकर, रावसाहेब कोकाटे, डॉ. समीर मगर, डॉ. गीता मगर, डॉ. मिलिंद खाडे, डॉ. संतोष काटकर, डॉ. सुनील गांधी, डॉ. सपना गांधी, डॉ. सिद्धार्थ सरोदे, रोटरी क्लबचे संजय दोशी, नरेंद्र गांधी, शौकतभाई तांबोळी, हुसेनभाई मुलाणी, गोरख भोसले, सुभाष पानसरे, जमीर शेख, आदिक इंगळे, अंगद तावरे, कैलास पवार, संतोष आटोळे, धनंजय कळमकर, जनार्दन क्षीरसागर, अभिमन्यू भोंग, प्रशांत सिताप, रावसाहेब गलांडे, सूर्यकांत कडू, के. वाय. सोनवले, राजेंद्र कांबळे, नानासाहेब घळकी, नवनाथ सुपेकर, अस्लमभाई बागवान, मुन्नाभाई बागवान, संदीप शहा, अरुण दोशी यांच्यासह विविध संघटनांचे मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक डॉ. संदेश शहा यांनी तर सूत्रसंचलन महेश निंबाळकर यांनी केले.
टिप्पण्या