वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ
आगामी जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीत जनशक्तीच्या जोरावर काँग्रेसच बाजी मारणार असल्याचा आशावाद काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष साहेबराव फडतरे यांनी व्यक्त केला.
वाल्हे ( ता. पुरंदर ) येथील महर्षी वाल्मीकी ऋषींच्या मंदिरात काँग्रेससह उध्दव बाळासाहेब ठाकरे तसेच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून साहेबराव फडतरे यांच्या निवडीबद्दल सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सत्काराला प्रतिउत्तर देताना फडतरे हे बोलत होते. ते पुढे म्हणाले आज मिळालेला सन्मान माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. या सन्मानामुळे मला माझ्या कामाची जबाबदारी अधिक जाणवते. यापुढेही मी माझ्या कार्यातून समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच जिल्हा परिषदेसह पुरंदर पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांच्या प्रचारार्थ पूर्ण ताकतीने रिंगणात उतरणार आहे.
याप्रसंगी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बरकडे शिक्षक काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष सचिन दुर्गाडे तसेच किरण कुमठेकर माजी सभापती गिरीश पवार सामाजिक कार्यकर्ते अतिश जगताप ठाकरे गटाचे सचिन पवार आम आदमी पार्टीचे राजन पवार यांसह आदी मान्यवर उपस्थित होते
टिप्पण्या