जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीच्या वतीने इंदापूर तालुक्यातील गुणवंत शिक्षकांचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10/01/2026 इंदापूर तालुका स्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम प्रसंगी तालुक्यातील 16 गावातील 250 गुणवंत आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
आदर्श गुणवंत शिक्षक म्हणजे केवळ शिक्षण देणारा नाही तर चांगले संस्कार, नीतिमत्ता, सहानुभूती आणि शिकण्याची आवड निर्माण करणारा, विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी झटणारा, आणि चांगला माणूस घडविणार्या शिक्षकांच्या गुणांना प्रोत्साहन देणार्या कार्यक्रमाचे आयोजन प्रशालेमध्ये करण्यात आले.
संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी सांगितले की, सर्व घटकातील मुलांना घडविण्याचे काम करणारे, नवीन पिढी घडविण्याचे काम करणारे शिक्षक करीत आहेत. कोणत्याही पदावर जाण्यासाठी शिक्षक महत्त्वाचा असतो म्हणुन या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे असे सांगितले.
कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. श्रीमंत ढोले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषण करताना सांगितले की, गुणवत्ता हाच शिक्षणाचा ध्यास हे ध्येय ठेवून ग्रामीण भागातील तसेच गोरगरीब, सर्वसामान्य जनतेतील मुलांना शिक्षण उपलब्ध करून दिले जाईल असे सांगितले.
सदर कार्यक्रमासाठी बापूराव शेंडे,संपतभाऊ सरक,मनोहर सांगळे,नानासाहेब नरुटे, आदिनाथ धायगुडे, किरण बेंद्रे, दिलीप वाघमोडे, स्वप्निल करगळ,किशोर वाघ, संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष श्रीमंत ढोले, उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले, सचिव हर्षवर्धन खाडे,
मुख्य सल्लागार प्रदीप गुरव, संस्थेचे विश्वस्त ऋषिकेश ढोले, पृथ्वीराज ढोले,
विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार, प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य राजेंद्र सरगर, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य सम्राट खेडकर व सर्व शिक्षक उपस्थित होते.
टिप्पण्या