अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त इंदापूरात भव्य आरोग्य शिबिर; हजारो नागरिकांनी घेतला मोफत आरोग्यसेवेचा लाभ
इंदापूर | प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व नारायणदास रामदास ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राचे कृषिमंत्री दत्तात्रय (दत्तामामा) भरणे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण भागातील हजारो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेत विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी, उपचार व मार्गदर्शन घेतले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अप्पासाहेब जगदाळे होते. यावेळी इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भरतशेठ शहा, डॉ. विद्युत शहा, शकीलभाई सय्यद आणि अक्षय सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, "अजितदादा पवार यांनी विकासाबरोबरच सर्वसामान्यांच्या आरोग्यालाही प्राधान्य दिले आहे. त्यांच्या प्रेरणेतून समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असून ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचे हे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. लोकसेवेच्या...