मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

शिवसृष्टी न्युज लक्ष्मी वैभव न्युज

भारताची जगात प्रतिमा उंचावण्याची काम नरेंद्र मोदींनी केले -हर्षवर्धन पाटील इंदापूर : प्रतिनिधी  नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व विश्वव्यापी असल्याचे सिद्ध झाले आहे. भारताची प्रतिमा जगात उंचावण्याची काम नरेंद्र मोदींनी कर्तबगारीने केले आहे. जगामध्ये व देशात नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे, असे गौरवद्गार भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे पत्रकार परिषदेत शनिवारी (दि.3) काढले. देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखालील भाजपच्या केंद्र सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केंद्र सरकारच्या कामगिरीची माहिती या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन पाटील यांनी दिली. भाजपने सन 2019 ला देशात 303 जागा जिंकल्या होत्या. तर आता सन 2024 ला भाजपचे 350 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट आहे, तर एनडीए (NDA) एकूण 400 जागा मिळतील, असे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली भाजपचे सरकार दि. 26 मे 2014 रोजी स्थापन झाले, त्यास आता 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. जगातील लोकप्रिय नेत्यांमध्ये नरेंद्र मोदींचा समावेश होत...

धर्मवीर संभाजी मित्र मंडळाच्या वतीने मधुकर भरणे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा

धर्मवीर संभाजी मित्र मंडळाच्या वतीने मधुकर भरणे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा  इंदापूर:- महाराष्ट्र राज्याचे मा.राज्यमंत्री व इंदापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय *दत्तात्रय (मामा) भरणे* व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, आमचे मार्गदर्शक *मधुकर (मामा) भरणे* यांचा वाढदिवस बाब्रस मळा येथे *धर्मवीर संभाजी मित्र मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती* तसेच *राजेंद्र चौगुले मित्र परिवार* यांचे वतीने साजरा करण्यात आला. प्रास्ताविक मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस यांनी केले तर आभार माळवाडीचे सरपंच बाळासाहेब व्यवहारे यांनी केले.                यावेळी उपस्थित मंडळाचे विश्वस्त व मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस, मा.नगरसेवक राजेंद्र चौगुले, मंडळाचे अध्यक्ष विनायक बाब्रस, मा.नगराध्यक्ष अशोक (नाना) गाणबोटे,  डॉ.अमोल उन्हाळे सर, आंनद मखरे, रामदास चौगुले, माऊली चौगुले, शुभम मखरे, प्रा.धेंडे सर, मनोज पवार, विवेक चौगुले, भारत चौगुले, सुभाष मोरे, समदभाई सय्यद इ. बहुसंख्येने उपस्थित होते.     ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

गिरीशभाऊ बापट, हे विकासाची दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते,-महारूद्र पाटील शिवसेना तालुकाप्रमुख इंदापूर  इंदापूर :- पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून खा.गिरीश बापट यांनी राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली, त्यानंतर प्रचंड जनसंपर्क व कर्तुत्वाच्या बळावर त्यांनी राजकारणात मागे पाहिले नाही. भाजपचे ते निष्ठावंत पाईक होते. पुणे शहरामध्ये भाजपला सत्तेच्या सर्वोच्च स्थानी पोहचविण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. राज्य मंत्रीमंडळामध्ये अन्न व नागरी पुरवठा, संसदीय कार्य आदी विविध खात्यांचे मंत्री म्हणूनही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा निर्माण केला. तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांचे जिल्ह्याच्या विकासामध्ये योगदान आहे. पुण्याचे खासदार म्हणूनही त्यांनी संसदेत सातत्याने पुणे शहराच्या विकासाचे प्रश्न मांडले.आशा शब्दात महारूद्र पाटील शिवसेना तालुकाप्रमुख इंदापूर यांनी श्रध्दाजंली वाहीली  त्यांच्या जाण्याने पुणे शहराची, त्याचबरोबर राज्य भाजपची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात महारूद्र पाटील शिवसेना तालुकाप्रमुख इंदापूर यांनी आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.या वेळी शिवस...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

तुषार बाबा जाधव मित्र परिवाराच्या वतीने निमगावात होम‎ मिनिस्टर‎ "खेळ रंगला पैठणीचा" धुमधडाक्यात कार्यक्रम संपन्न इंदापूर :- तालुक्यातील निमगाव केतकी,ग्रामीण भागातील महिलांसह‎ युवती, वृद्ध महिलांनी‎ विविध स्पर्धेत‎ सहभाग घेण्याच्या उद्देशाने तसेच ‎निमगाव केतकी येथील सांस्कृतिक वैभवात भर‎ घालण्यासाठी तुषार (बाबा )जाधव मित्र परिवाराच्या  माध्यमातून देवराज जाधव व अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व सोनाली तुषार जाधव यांच्या संकल्पनेतून , गुढीपाडव्या निमित्त  सिने अभिनेता क्रांतीनाना‎ माळेगावकर,होम‎ मिनिस्टर‎ "खेळ रंगला पैठणीचा" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद देत निमगाव केतकी परिसरातील महिलांच्या कार्यक्रमाचे सर्व विक्रम मोडले. जवळपास सहा ते सात हजार महिलांनी यात सहभाग नोंदवला.या कार्यक्रमासाठी सिने‎ अभिनेते क्रांतीनाना‎ माळेगावकर सह  बाल कलाकार, गायक सह्याद्री‎ माळेगावकर यांनी आपल्या विनोदी शैलीत सूत्रसंचालन करत उपस्थित महिला, वृद्ध तसेच प्रेक्षकांची मने जिंकली. साठ वर्षावरील वृद्ध महिलांनी केलेल्या डान्स मुळे ...

शिवसृष्टी न्युज लक्ष्मी वैभव न्युज

आ.दत्तात्रय भरणे यांची विधानसभा लक्षवेधी सूचना,मालोजी राजे यांच्या गढीसंवर्धनासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद,जुनी कचेरी पर्यटन स्थळ म्हणून घोषित अभिनंदन-   प्रकाश पप्पुशेठ पवार   इंदापूर:- मा. आमदार दत्तामामा भरणे . बहुजनांचे नेते यांनी मालोजीराजे गढीसंवर्धनासाठी आवाज उठवला व इंदापूर चा इतिहास जागृत ठेवला ... मा. प्रकाश ( पप्पूशेठ ) पवार . शहराध्यक्ष इंदापूर मौर्य क्रांती संघ / विचार मंथन ग्रुप ॲडमिन . वीरश्री मालोजीराजे गढीसंवर्धनासाठी कित्येक वर्ष इंदापूर कर संघर्ष करत होता . इंदापूरचा इतिहास जागृत करण्याचा प्रयत्न करत होता . मा . दिवंगत रत्नाकर ( तात्या ) मखरे यांनी या प्रकरणात सतत आक्रमक भूमिका मांडत आंदोलन / उपोषण केली होती नंतर काही काळाने शिवप्रेमी / शिवभक्त यांनी ही आवाज उठवला होता . याची चर्चा खूप होत होती मात्र मार्ग निघत नव्हता .. अखरे इंदापूरचा इतिहास जागृत झाला पाहिजे लोकांना वीरश्री मालोजी राजे गढी संदर्भात माहिती मिळाली पाहिजे . इंदापूरचा खरा इतिहास समजला पाहिजे या साठी सर्व बहुजन लोक / इंदापूरकरांनी एकत्रीत पणे आवाज उठवला पाहिजे संघर्षला सामोरे...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

जीवन सुंदर आणि रंगीबेरंगी असून, ही होळी तुमच्या आयुष्यात आणि प्रत्येक कुटुंबामध्ये अधिक प्रेम आणि आनंदाचे रंग निर्माण करेल- महारूद्र पाटील इंदापूर : होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा, आळस, द्वेष, मत्सर, मतभेद यांचे दहन होऊन, सर्वांना निरोगी व उत्तम आरोग्य लाभावे तसेच प्रत्येक कुटुंबामध्ये आनंद, सुख आणि शांती कायम तेवत राहावी, अशा शब्दात महारूद्र पाटील शिवसेना तालुकाप्रमुख इंदापूर यांनी होळी व धुलीवंदनाच्या जनतेला शुभेच्छा मंगळवारी व्यक्त केल्या.          भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीनकालापासून  होळी व धुलीवंदन सणास अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या सणाच्या निमित्ताने होळीच्या अग्निमध्ये विचारांची नकारात्मकता जळून जाऊन प्रेम, शांती, आनंद हा प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये निर्माण व्हावा, अशा शुभेच्छा महारूद्र पाटील यांनी व्यक्त केल्या.         

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर महाविद्यालय 8 मार्च रोजी अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन    जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचत गट असोसिएशन व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त कला , विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे 8 मार्च 2023 रोजी सकाळी 9  वा. जिल्हा परिषदेच्या सदस्या व इसमा कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.   8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात येतो. राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन  पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.    मोठ्या संख्येने मुली व महिलांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.