तुषार बाबा जाधव मित्र परिवाराच्या वतीने निमगावात होम मिनिस्टर "खेळ रंगला पैठणीचा" धुमधडाक्यात कार्यक्रम संपन्न
इंदापूर :- तालुक्यातील निमगाव केतकी,ग्रामीण भागातील महिलांसह युवती, वृद्ध महिलांनी विविध स्पर्धेत सहभाग घेण्याच्या उद्देशाने तसेच निमगाव केतकी येथील सांस्कृतिक वैभवात भर घालण्यासाठी तुषार (बाबा )जाधव मित्र परिवाराच्या माध्यमातून देवराज जाधव व अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व सोनाली तुषार जाधव यांच्या संकल्पनेतून , गुढीपाडव्या निमित्त सिने अभिनेता क्रांतीनाना माळेगावकर,होम मिनिस्टर "खेळ रंगला पैठणीचा" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद देत निमगाव केतकी परिसरातील महिलांच्या कार्यक्रमाचे सर्व विक्रम मोडले. जवळपास सहा ते सात हजार महिलांनी यात सहभाग नोंदवला.या कार्यक्रमासाठी सिने अभिनेते क्रांतीनाना माळेगावकर सह बाल कलाकार, गायक सह्याद्री माळेगावकर यांनी आपल्या विनोदी शैलीत सूत्रसंचालन करत उपस्थित महिला, वृद्ध तसेच प्रेक्षकांची मने जिंकली. साठ वर्षावरील वृद्ध महिलांनी केलेल्या डान्स मुळे कार्यक्रमाला रंगत आली. पुरूष वर्गही महिलांच्या या आनंदात सहभागी झाला व त्यांनीही या रंगतदार व दिमाखदार सोहळ्याचा आनंद घेतला.
यावेळी नुकत्याच झालेल्या महिला दिनाचे औचित्य साधून निमगांव केतकी परिसरातील २६ कर्तृत्ववान महिलांचा 'सन्मान नारीशक्तीचा' हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले.
त्याचप्रमाणे ज्येष्ठ शिक्षक विष्णू कोकणे यांनी केलेल्या अविरत सेवेबद्दल आदर्श गुरुवर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मोनाली हेगडे या कार्यक्रमातील एक तोळा नेकलेस,नथणी आणि पैठणी या प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाच्या मानकरी ठरल्या. त्याचप्रमाणे सर्व विजेत्या महिलांना पुढील प्रमाणे बक्षीस वितरण करण्यात आले. द्वितीय बक्षीस प्रतीक्षा बोराटे ४३ इंची स्मार्ट टिव्ही, तृतीय बक्षीस रजनी शिंदे फ्रीज, चतुर्थ बक्षीस मनीषा राऊत वॉशिंग मशिन, पाचवे बक्षीस सुनिता शेंडे पिण्याच्या पाण्याचा फिल्टर, सहावे बक्षीस अनिता माने स्मार्टफोन, सातवे बक्षीस पायल आदलिंग आटा चक्की, आठवे बक्षीस रूपाली माने कुलर, नववे बक्षीस मिक्सर, दहावे बक्षीस गॅस शेगडी, अकरावे बक्षीस पूजा शिंदे टेबल फॅन याच्यासह विविध गृह उपयोगी वस्तूंची बक्षीसे देण्यात आली.
टिप्पण्या