जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचत गट असोसिएशन व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त कला , विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे 8 मार्च 2023 रोजी सकाळी 9 वा. जिल्हा परिषदेच्या सदस्या व इसमा कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात येतो. राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मोठ्या संख्येने मुली व महिलांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या