भारताची जगात प्रतिमा उंचावण्याची काम नरेंद्र मोदींनी केले -हर्षवर्धन पाटील
इंदापूर : प्रतिनिधी
नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व विश्वव्यापी असल्याचे सिद्ध झाले आहे. भारताची प्रतिमा जगात उंचावण्याची काम नरेंद्र मोदींनी कर्तबगारीने केले आहे. जगामध्ये व देशात नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे, असे गौरवद्गार भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे पत्रकार परिषदेत शनिवारी (दि.3) काढले.
देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखालील भाजपच्या केंद्र सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केंद्र सरकारच्या कामगिरीची माहिती या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन पाटील यांनी दिली. भाजपने सन 2019 ला देशात 303 जागा जिंकल्या होत्या. तर आता सन 2024 ला भाजपचे 350 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट आहे, तर एनडीए (NDA) एकूण 400 जागा मिळतील, असे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली भाजपचे सरकार दि. 26 मे 2014 रोजी स्थापन झाले, त्यास आता 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. जगातील लोकप्रिय नेत्यांमध्ये नरेंद्र मोदींचा समावेश होत आहे, ही प्रत्येक भारतीयांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे भाजप ब्रीदवाक्य असून त्यानुसार केंद्र सरकार काम करीत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जे.पी. नड्डा जी यांनी 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दि.31 मे ते 30 जून या कालावधीत देशभर महासंपर्क अभियान सुरू केले आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेद्वारे शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6 हजार रुपये देण्यात येत आहे. तसेच फक्त 1 रुपयांमध्ये शेतकऱ्यांना पिक विमा दिला जाणार आहे. जम्मू काश्मीरमधील 370 कलम रद्द करण्यात आले. आयुष्यमान भारत योजनेसाठी गोल्डन कार्ड नागरिकांना देण्यात येत आहे. देशातील 55 कोटी जनतेला या योजनेचा लाभ होत आहे. इंदापूर तालुक्यातील आपण ही योजना राबविण्यासाठी शिबिरे घेतली.
देशाचे पहिले सहकारी मंत्री म्हणून अमित शाह यांनी देशातील सहकार चळवळ मजबुतीसाठी अनेक धाडसी निर्णय घेत आहेत. कोविड काळात देशातील 82 कोटी जनतेला मोफत धान्य दिले. सध्या चालु असलेल्या सन 2023 या वर्षात देशातील जनतेला पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत वर्षभर मोफत धान्य दिले जात आहे,असे ते म्हणाले.
देशात अनेक महामार्गाचे जाळे निर्माण केले, तसेच मेट्रोचे जाळे निर्माण केले. सुविधा उपलब्ध केल्याने विमान प्रवास वाढला आहे. केंद्र सरकारकडून ' हर घर हर जल ' योजना राबविली जात आहे. त्याचा लाभ पुणे जिल्ह्यातील प्रत्येक गावाला मिळत आहे. इंदापूर तालुक्यामध्ये 1353 कोटी रुपयांचा निधी केंद्र व राज्य सरकारने हरघर हरजल योजनेसाठी दिला आहे. कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होणेसाठी कामातील अनियमितता खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही हर्षवर्धन पाटील यांनी दिला. महासंपर्क अभियानाच्या कालावधीमध्ये सोशल मीडिया, रॅली, लाभार्थी मिळावे, प्रत्येक तालुक्यातील 10 हजार नागरिकांना कार्यकर्ते हे भेटणार आहेत, अशी माहिती यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
•चौकट :-
---------
बारामती मतदारसंघाच्या महासंपर्क अभियान प्रमुखपदी हर्षवर्धन पाटील.
-------------------------------------------
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जे.पी. नड्डा जी यांनी 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दि.31 मे ते 30 जून या कालावधीत देशभर महासंपर्क अभियान सुरू केले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाभियानाचे प्रमुख भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे आहेत. तर तीन लोकसभा मतदारसंघाचे क्लस्टर प्रमुख म्हणून केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल हे जबाबदारी पार पाडत आहेत.
•चौकट :-
-----------
अमित शाह चालू महिन्यात बारामती मतदारसंघात येणार - हर्षवर्धन पाटील
------------------------------------
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महासंपर्क अभियानामध्ये केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह हे चालू जून महिन्यात सहभागी होणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची वेळ व कार्यक्रमाचे ठिकाण याची माहिती लवकर दिली जाईल, असे यावेळी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष अँड शरद जामदार यांनी आभार इंदापूर शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी मानले.
या कार्यक्रमास माऊली चवरे बापूराव जामदार सचिन जामदार गलांडवाडी चे सरपंच गोपीचंद गलांडे संदीप चव्हाण दादासाहेब पिसे अविनाश कोथमीरे ,धनंजय पाटील,सागर गानबोटे, गोरख शिंदे उपस्थित होते यावेळी
टिप्पण्या