गिरीशभाऊ बापट, हे विकासाची दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते,-महारूद्र पाटील शिवसेना तालुकाप्रमुख इंदापूर
इंदापूर :- पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून खा.गिरीश बापट यांनी राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली, त्यानंतर प्रचंड जनसंपर्क व कर्तुत्वाच्या बळावर त्यांनी राजकारणात मागे पाहिले नाही. भाजपचे ते निष्ठावंत पाईक होते. पुणे शहरामध्ये भाजपला सत्तेच्या सर्वोच्च स्थानी पोहचविण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. राज्य मंत्रीमंडळामध्ये अन्न व नागरी पुरवठा, संसदीय कार्य आदी विविध खात्यांचे मंत्री म्हणूनही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा निर्माण केला. तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांचे जिल्ह्याच्या विकासामध्ये योगदान आहे. पुण्याचे खासदार म्हणूनही त्यांनी संसदेत सातत्याने पुणे शहराच्या विकासाचे प्रश्न मांडले.आशा शब्दात महारूद्र पाटील शिवसेना तालुकाप्रमुख इंदापूर यांनी श्रध्दाजंली वाहीली त्यांच्या जाण्याने पुणे शहराची, त्याचबरोबर राज्य भाजपची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात महारूद्र पाटील शिवसेना तालुकाप्रमुख इंदापूर यांनी आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.या वेळी शिवसेना शहर प्रमुख पै.अशोकभाऊ देवकर, बालाजी पाटील, सोशल मिडीया इंदापूर अवधूत पाटील, सह इतर मान्यवर उपस्थित होते,
टिप्पण्या