इंदापूर : होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा, आळस, द्वेष, मत्सर, मतभेद यांचे दहन होऊन, सर्वांना निरोगी व उत्तम आरोग्य लाभावे तसेच प्रत्येक कुटुंबामध्ये आनंद, सुख आणि शांती कायम तेवत राहावी, अशा शब्दात महारूद्र पाटील शिवसेना तालुकाप्रमुख इंदापूर
यांनी होळी व धुलीवंदनाच्या जनतेला शुभेच्छा मंगळवारी व्यक्त केल्या.
भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीनकालापासून होळी व धुलीवंदन सणास अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या सणाच्या निमित्ताने होळीच्या अग्निमध्ये विचारांची नकारात्मकता जळून जाऊन प्रेम, शांती, आनंद हा प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये निर्माण व्हावा, अशा शुभेच्छा महारूद्र पाटील यांनी व्यक्त केल्या.
कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट
इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...
टिप्पण्या