मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

श्री क्षेत्र नरसिंहपूर येथील महापुराची हर्षवर्धन पाटील यांचेकडून पाहणी  इंदापूर:प्रतिनिधी               श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर येथील महापुराची भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी (दि.15) पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिक व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.                  या भेटीच्या वेळी हर्षवर्धन पाटील यांनी ग्रामस्थांना दिलासा दिला व सर्वतोपरी सहकार्य केले जाईल,अशी ग्वाही दिली.घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरलेल्या ग्रामस्थांना व  दुकानदारांना शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. तसेच भीमा व नीरेच्या पुराने पाण्याखाली गेलेल्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केली.             दरम्यान, गुरुवारी दिवसभरात पुणे जि.प. सदस्या कु.अंकिता पाटील तसेच नीरा भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनीही श्रीक्षेत्र ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

गोरगरींचे कैवारी, जनसामान्याचे नेतृत्व मा.राजवर्धनदादा पाटील यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी इंदापुर : जनसामान्याचे नेतृत्व मा. राजवर्धनदादा पाटील यांनी आज गुरुवार दिनांक.१५/१०/२०२० रोजी गणेशवाडी  व नरसिंहपूर येथे काल १४ऑक्टोबर रोजी  अतिवृष्टीमुळे  शेतकऱ्यांचे व सर्व सामान्य जनतेचे अतोनात नुकसान झाल्याची पाहणी केली त्यावेळी त्यांचे नुकसान ग्रस्तांचे त्वरित पंचनामे करून प्रशासनाने त्यांना मदत करावी  अशी  मागणी त्यांनी  केली यावेळी दादा म्हणाले ,"आसमानी संकटामुळे कुटुंबांचा आर्थिक कणाच मोडून पडला आहे. त्यांच्या दुःखाला पारावार उरला नाही. पिकांचे घरांचे मोठे नुकसान झाले आहे.  काही ठिकाणी घरे ओढ्याला आलेल्या पुरामुळे पाण्याखाली गेली आहेत. आपल्या लेकरांना घेऊन  या पावसात लोक  दुसऱ्या ठिकाणी आश्रयाला गेली आहेत.  हे हृदय हेलावणारे चित्र पाहून फारच वेदना व दुःख होत आहे". असे मत व्यक्त करून त्यांनी संकटाच्या काळात कुणाला काही मदत लागल्यास मला फोन करा असे सांगितले. राजवर्धन पाटील हे ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

जळालेल्या घरामुळे मोडलेल्या संसाराला भावी जिल्हा परिषद सदस्य अमोलराजे इंगळे यांनी दिला मदतीचा हात  इंदापूरः तालुक्यातील बेडसिंगे येथील विष्णू ज्योतिराम अवचर या शेतकऱ्याच्या घराला अचानक आग लागली त्यामुळे घरातील सर्व साहित्य जळून गेले. कोरोना चे भयानक संकट व  अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला असताना व सामान्य जनतेच्या हाताला काम नसल्याने आणखीनच भले मोठे  संकट अवचर यांच्यासमोर उभे राहिले आहे,म्हणजेच दुष्काळात तेरावा महिना,यावेळी त्यांच्या शेजारी असणाऱ्या नागरीकांनी त्यांना जीवनावश्यक वस्तू चा आधार देण्याचा प्रयत्न केला. ही घटना समझताच भारतीय जनता पक्षाचे युवा नेते व भावी जिल्हा परिषद सदस्य  मा.अमोलराजे इंगळे यांनी अवचर कुटुंबाला भेट देऊन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला,यावेळी बोलताना अवचर म्हणाले की आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी भेटून आम्हाला मदत दिली नाही, तलाठी यांनी येऊन पंचनामा केला आहे, परंतु आम्हाला तत्काळ मदतीची गरज आहे. यावेळी अमोलराजे इंगळे म्हणाले की आम्ही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून लागेल ती मदत करु,अवचर यांचे घ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

कर्मयोगी कारखाना 31 व्या गळीत हंगामात विक्रमी ऊस गाळप करणार”हर्षवर्धन पाटील (दि. 11 ऑक्टोबर) – कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचा हंगाम 2020-21 चा 31 वा गळीत हंगाम शुभारंभ व गव्हाण पुजन समारंभ आज विधीवत पुजेसह महाराष्ट राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंञी तथा कारखान्याचे आदरणीय चेअरमन मा.श्री. हर्षवर्धनजी पाटीलसो, व्हाईस चेअरमन मा.श्रीमती पद्माताई भोसले यांचे शुभहस्ते व सर्व संचालक मंडळ यांचे उपस्थितीमध्ये संपन्न झाला.       या गळीत हंगामामध्ये कारखान्याने 14 लाख मे.टन गाळप करणेचे उदिदष्ठ ठेवलेले असून त्यासाठी आवश्यक ती तोडणी वाहतुक यंञणा कारखाना कार्यक्षेञामध्ये हजर झालेली आहे. तसेच या हंगामामध्ये डिस्टीलरीचे उत्पादन 1 कोटी 30 लाख ब.लि., सहवीज निर्मिती 3 कोटी युनिटस, बायोगॅस 12 लाख घनमीटर, सेंद्रीय खत 4 लाख बॅग, कंपोष्ट खत 24 हजार मे.टन व जैविक खते/औषधे 20 हजार लिटर एवढे उत्पादन पूर्ण करणेचे उदिदष्ठ कारखान्याने या हंगामामध्ये ठेवलेले आहे.       मागील वर्षीच्या गाळप हंगामामध्ये गाळप झालेल्या ऊसाची ...

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

विभागीय कार्यालयावर शेतकरी कामगार पक्षाचे जोरदार निदर्शने सरकारच्या विरोधात घोषणांनी परिसर दणाणून सोडला औरंगाबाद (प्रतिनिधी) विभागीय कार्यालयावर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने निदर्शने करत शासनाच्या विरोधामध्ये जोरदार घोषणा बाजी केली. मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना 50 हजार रुपये हेक्टरी तात्काळ मदत करा, केंद्र सरकारने नव्याने केलेले कृषी विधेयक तात्काळ रद्द करा, कापसाला आठ हजार रुपये किमान भाव द्या, कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवा, मागील वर्षाच्या ऊस गाळपाचा एफआरपीप्रमाणे ऊसाचा हप्ता कारखानदाराने वाटप करावा,            या मागण्यासाठी आज शेतकरी कामगार पक्ष मराठवाडा च्या वतीने निदर्शने करण्यात आली केंद्र सरकारच्या विरोधामध्ये कार्यकर्त्यानी घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी प्रचंड रोष व्यक्त केला विभागीय आयुक्त यांच्याकडे निवेदन आंदोलनकर्त्यांनी मागण्याचे निवेदन देण्यात आले शेतकरी कामगार पक्षच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे निदर्शने करताना भाई प्रा उमाकांत राठोड भाई प्रा चंद्रकांतजी चव्हा...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

गरीबी निर्मूलनाची चळवळ इंदापूरमध्ये प्रभावीपणे राबवावी : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील. इंदापूर : प्रतिनिधी  अखिल भारतीय गरीबी निर्मूलन समितीच्या इंदापूर तालुक्यातील सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी गरिबी निर्मुलनाची चळवळ इंदापूरात प्रभावीपणे राबवावी असे मत राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी  दि. ५ रोजी निमगांव-केतकी ता. इंदापूर येथे श्री. केतकेश्वर मंगल कार्यालयात शिवराज ज्वेलर्स व अमोलराजे इंगळे व मित्र पारिवार इंदापूर यांच्या वतीने . जेष्ठ पत्रकार डॉ .विकास शहा यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले . यावेळी अखिल भारतीय गरिबी निर्मुलन समितीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष काकासाहेब मांढरे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष धनंजय कळमकर, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख दीपक खिलारे, उपाध्यक्ष असिफभाई शेख व  हमीदभाई आत्तार. श्रमिक पत्रकार संघाच्या व विश्ववारकरी सेना महाराष्ट्र राज्य यांच्या नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचा  गौरव हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला  ते पुढे म्हणाले की,कोणत्या...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

श्रमीक पत्रकार संघ, इंदापूर तालुका अखिल भारतीय गरीबी निर्मुल समिती विश्व वारकरी सेना संघटना  यांचा सन्मान हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते संपन्न  इंदापुर:माजी सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य मा.श्री. हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या शुभहस्ते , सोमवार दि.५/१०/२०२० रोजी  श्री. केतकेश्वर मंगल कार्यालय निमगाव केतकी येथे श्रमीक पत्रकार संघ, इंदापूर तालुका अखिल भारतीय गरीब निर्मुल समिती विश्व वारकरी सेना संघटना या सर्व प्रमुख पदाधिकारी व जेष्ठ पत्रकार यांचा  गौरव समारंभ संपन्न झाला.हर्षवर्धन पाटील  यावेळी बोलताना म्हणाले की ,"श्रमिक  पत्रकार संघ हा पत्रकारिता क्षेत्रातील प्रामाणिक पणे काम करणारे संघटन असून, आपली नैतिकता जपून समाजहित करण्याकडे त्यांचा स्थापनेपासूनच मोठा वाटा आहे. ही पत्रकारिता क्षेत्रातील एक चळवळ असून या चळवळीशी जोडलेल्या सर्वांचे मी हार्दिक अभिनंदन करतो या वेळी तालुका अध्यक्ष सुरेशराव मिसाळ,   देविदास राखुंडे, राहुल ढवळे, विजयराव शिंदे, शिवाजी पवार, इमतीयाज मुलाणी, इ,पदाधिकारी यांचा सन्मान हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आ...