इंदापुर :जनसामान्याचे नेतृत्व मा. राजवर्धनदादा पाटील यांनी आज गुरुवार दिनांक.१५/१०/२०२० रोजी गणेशवाडी व नरसिंहपूर येथे काल १४ऑक्टोबर रोजी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे व सर्व सामान्य जनतेचे अतोनात नुकसान झाल्याची पाहणी केली त्यावेळी त्यांचे नुकसान ग्रस्तांचे त्वरित पंचनामे करून प्रशासनाने त्यांना मदत करावी
अशी मागणी त्यांनी केली यावेळी दादा म्हणाले ,"आसमानी संकटामुळे कुटुंबांचा आर्थिक कणाच मोडून पडला आहे. त्यांच्या दुःखाला पारावार उरला नाही. पिकांचे घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
काही ठिकाणी घरे ओढ्याला आलेल्या पुरामुळे पाण्याखाली गेली आहेत. आपल्या लेकरांना घेऊन या पावसात लोक दुसऱ्या ठिकाणी आश्रयाला गेली आहेत.
हे हृदय हेलावणारे चित्र पाहून फारच वेदना व दुःख होत आहे". असे मत व्यक्त करून त्यांनी संकटाच्या काळात कुणाला काही मदत लागल्यास मला फोन करा असे सांगितले.
राजवर्धन पाटील हे प्रत्येकाच्या सुखदुःखात नेहमीच सर्वांच्या मदती साठी कायम उभे आसतात. कोणतेही पद नसताना सामाजिक कार्यात अग्रेसर आसणारे राजवर्धन पाटील हे गोरगरीब जनतेचा कैवारी, जनसामान्यांचा बुलंद आवाज म्हणून परिचित आहेत, कारण आमदार, खासदार यांच्या आगोदर मदतीचा हात देणारे राजवर्धन पाटील यांची ख्याती आहे,
टिप्पण्या