कर्मयोगी कारखाना 31 व्या गळीत हंगामात विक्रमी ऊस गाळप करणार”हर्षवर्धन पाटील
(दि. 11 ऑक्टोबर) – कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचा हंगाम 2020-21 चा 31 वा गळीत हंगाम शुभारंभ व गव्हाण पुजन समारंभ आज विधीवत पुजेसह महाराष्ट राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंञी तथा कारखान्याचे आदरणीय चेअरमन मा.श्री. हर्षवर्धनजी पाटीलसो, व्हाईस चेअरमन मा.श्रीमती पद्माताई भोसले यांचे शुभहस्ते व सर्व संचालक मंडळ यांचे उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
या गळीत हंगामामध्ये कारखान्याने 14 लाख मे.टन गाळप करणेचे उदिदष्ठ ठेवलेले असून त्यासाठी आवश्यक ती तोडणी वाहतुक यंञणा कारखाना कार्यक्षेञामध्ये हजर झालेली आहे. तसेच या हंगामामध्ये डिस्टीलरीचे उत्पादन 1 कोटी 30 लाख ब.लि., सहवीज निर्मिती 3 कोटी युनिटस, बायोगॅस 12 लाख घनमीटर, सेंद्रीय खत 4 लाख बॅग, कंपोष्ट खत 24 हजार मे.टन व जैविक खते/औषधे 20 हजार लिटर एवढे उत्पादन पूर्ण करणेचे उदिदष्ठ कारखान्याने या हंगामामध्ये ठेवलेले आहे.
मागील वर्षीच्या गाळप हंगामामध्ये गाळप झालेल्या ऊसाची उर्वरीत एफ.आर.पी.ची रक्कम लवकरंच ऊस उत्पादक शेतक-यांच्या खात्यावर वर्ग करीत आहोत अशी ग्वाही मा.श्री. हर्षवर्धनजी पाटील यांनी यावेळी दिली. तसेच चालू गळीत हंगामामध्ये गाळप होणा-या ऊसास आजूबाजूचे कारखान्याचे बरोबरीने ऊसाला दर दिला जाईल व दर पंधरवाडयाला ऊसाची बीले व ऊस तोडणी वाहतुकदारांची बीले संबंधित सभासदांचे व वाहतुकदारांचे खात्यामध्ये वर्ग करणार आहोत असेही यावेळी मा.श्री. हर्षवर्धनजी पाटीलसो यांनी सांगितले.
यावर्षी आपले कार्यक्षेञामध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे, त्यामुळे कारखान्यास ऊसाची उपलब्धता मुबलक आहे. यावेळी कारखान्याचे चेअरमन मा.श्री. हर्षवर्धनजी पाटील यांनी सर्व ऊस उत्पादक सभासद, कारखान्याचे वाहतुकदार, तोडणी मुकादम व सर्व कामगारांचे सहकार्याने कार्यक्षेञामधील संपुर्ण ऊसाचे गाळप करुन हा गळीत हंगाम यशस्वी करणेचा मानस व्यक्त केला.
या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक श्री. भरतशेठ शहा, श्री. भास्कर गुरगुडे, श्री. विष्णू मोरे, श्री. हनुमंत जाधव, श्री. मच्छिंद्र अभंग, श्री. अंकुश काळे, श्री. सुभाष काळे, श्री. प्रशांत सुर्यवंशी, श्री. यशवंत वाघ, श्री. मानसिंग जगताप, श्री.राजेंद्र गायकवाड, श्री. राहूल जाधव, श्री. अंबादास शिंगाडे, श्री. वसंत मोहोळकर, श्री. केशव दुर्गे, श्री. अतुल व्यवहारे, श्री. राजेंद्र चोरमले, श्री. पांडुरंग गलांडे, श्री. सुभाष भोसले, सौ. जयश्री नलवडे, कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.बाजीराव जी. सुतार, व सर्व खाते विभागप्रमुख उपस्थित होते. ============================== या हंगामामध्ये कर्मयोगी 75 लाख लिटर इथेनॉलचे उत्पादन करणार असून उत्पादित इथेनॉल ऑईल कंपन्यांना विक्री करणार असलेचे मा.श्री. हर्षवर्धनजी पाटील यांनी सांगितले.
टिप्पण्या