इंदापूरः तालुक्यातील बेडसिंगे येथील विष्णू ज्योतिराम अवचर या शेतकऱ्याच्या घराला अचानक आग लागली त्यामुळे घरातील सर्व साहित्य जळून गेले.
कोरोना चे भयानक संकट व अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला असताना व सामान्य जनतेच्या हाताला काम नसल्याने आणखीनच भले मोठे संकट अवचर यांच्यासमोर उभे राहिले आहे,म्हणजेच दुष्काळात तेरावा महिना,यावेळी त्यांच्या शेजारी असणाऱ्या नागरीकांनी त्यांना जीवनावश्यक वस्तू चा आधार देण्याचा प्रयत्न केला.
ही घटना समझताच भारतीय जनता पक्षाचे युवा नेते व भावी जिल्हा परिषद सदस्य मा.अमोलराजे इंगळे यांनी अवचर कुटुंबाला भेट देऊन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला,यावेळी बोलताना अवचर म्हणाले की आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी भेटून आम्हाला मदत दिली नाही, तलाठी यांनी येऊन पंचनामा केला आहे, परंतु आम्हाला तत्काळ मदतीची गरज आहे.
यावेळी अमोलराजे इंगळे म्हणाले की आम्ही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून लागेल ती मदत करु,अवचर यांचे घर आगीत जाळून खाक झाले आहे,अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे,कोरोना मुळे सर्वत्र मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे, तरी या शेतक-याला नव्याने उभा राहण्यासाठी आपण बळ देऊ, तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन अवचर कुटुंबियांना मदत करावी अशी विनंती भावी जिल्हा परिषद सदस्य अमोलराजे इंगळे यांनी केली.
इतर अनेक सामाजिक संघटनांनी व राजकीय नेते, कार्यकर्ते यांनी अवचर यांच्या घराला मदतीचा हात द्यावा, व या कुटुंबाला नव्याने उभा राहण्यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे, आशी सर्वत्र चर्चा आहे. अमोलराजे इंगळे यांनी केलेली मदत त्या उघड्यावर पडलेल्या कुटुंबियांना लाख मोलाची आहे,यावर एक कविता आठवली "मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, फक्त लढ म्हणा’!"
यावेळी हरी जाधव, किरण यादव, सुधीर यादव, प्रवीण देवकर ,उपस्थित होते.
टिप्पण्या