कारखाना चालतोय 'सहकारा'वर, शेतकरी जगतोय 'उधारी'वर..! पाटलांच्या 'कर्मयोगीला' लागला थकीत बिलांचा डाग.; शेतकरी आक्रमक!
इंदापूर:- एकेकाळी सहकार क्षेत्रात आदर्श मानला जाणाऱ्या इंदापूरच्या 'कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्या'च्या नावाला आज ग्रहण लागले आहे. कर्मयोगी शंकरराव भाऊ पाटील आणि गोकुळदास भाई शहा यांनी अत्यंत शिस्तबद्ध नियोजनाने जो कारखाना शेतकऱ्यांचा 'आधारस्तंभ' बनवला होता, त्याच कारखान्यात आज शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांसाठी त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे.
एक काळ असा होता की, कारखान्याच्या गेटमधून ऊस गेला की काही दिवसांतच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायचे. 'शेतकरी सुखी तरच कारखाना सुखी' हे ब्रीदवाक्य या दिग्गज नेत्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणले होते. मात्र, आज चित्र पूर्णपणे बदलले आहे. कारखान्याचे सूत्रे बाबुराव बोत्रे यांच्या हाती सोपवल्यापासून शेतकऱ्यांच्या नशिबी केवळ हतबलता आली आहे. ऊस देऊन पाच-सहा महिने उलटले, तरी अद्याप शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळालेले नाहीत.
मा.ना.हर्षवर्धनभाऊ पाटील आणि मा.भरतभाऊ शहा यांच्या काळात कारखाना सुरळीत चालला होता.ऊस बीलाची शेतकरीवर्गाला चिंता नव्हती,पण काही कारणास्तव, त्यानंतर कारखान्याची धुरा ज्यांच्या हाती देण्यात आली, त्यांनी शेतकऱ्यांच्या विश्वासाला आणि कर्मयोगींच्या नावाला काळीमा फासण्याचे काम केले आहे, अशी संतप्त चर्चा इंदापूर तालुक्यात सुरू आहे. राजकीय सोयीनुसार कारखान्याचे निर्णय घेतले जात आहेत, मात्र ज्या शेतकऱ्यांच्या जोरावर हा कारखाना उभा राहिला, त्यांच्या व्यथांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे.
कसलीही भीक नको," असा सणसणीत इशारा संतप्त शेतकरी देत आहेत. आंदोलकांचे उंबरठे झिजवूनही पदरात काहीच पडत नसल्याने, शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध आता फुटला आहे. जे कारखान्याचे व्यवस्थापन पाहतात, त्यांना शेतकऱ्यांच्या व्यथा काय कळणार? केवळ 'बांडगुळाप्रमाणे' कारखान्यावर ताबा मिळवून शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्यांनी आता तरी कान उघडून ऐकावे, ऊस बिल मिळाल्याशिवाय शेतकरी शांत बसणार नाहीत.
सहकार चळवळीला बदनाम करणाऱ्या या कारभाराची दखल कोण घेणार? आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यांचे हक्काचे पैसे कधी जमा होणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
आमचा ऊस घेऊन कारखान्याने साखर विकली, नफा कमावला, मग आमचे पैसे का थकवले?" असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत. शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव नसलेली ही मंडळी केवळ स्वतःची तुंबडी भरण्यात मग्न असल्याचा आरोपही केला जात आहे. "आम्हाला आमच्या घामाचे दाम त्वरित मिळालेच पाहिजेत, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र होईल," असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे..
आशी जनतेत चर्चा..!
टिप्पण्या