"बाप जगू देईना आणि आई भीक मागू देईना..." अशी अत्यंत विदारक आणि काळजाचा थरकाप उडवणारी परिस्थिती आज इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथील सामान्य शेतकऱ्याची झाली आहे. आधीच तीव्र दुष्काळाच्या होरपळीत होरपळणाऱ्या शेतकऱ्याला आता निसर्गानेही दगा दिला आहे. सरडेवाडी परिसरात झालेल्या भीषण चक्रीवादळ आणि मुसळधार पावसाने इथल्या शेतकऱ्यांचे कंबरडे पार मोडून टाकले आहे.
या वादळी वाऱ्याचा सर्वात मोठा आणि भीषण फटका शेतकरी नितीन कोकरे यांना बसला आहे. निसर्गाच्या तांडवामुळे नितीन कोकरे यांचे राहते घर आणि जनावरांचा गोठा अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. डोक्यावरचे छत हिरावले गेले असून, मुक्या जनावरांचा आसराही या वादळाने हिरावून घेतला आहे. लाखो रुपयांचे नुकसान डोळ्यांदेखत झाल्याने कोकरे कुटुंबीयांवर उघड्यावर येण्याची वेळ आली आहे.
नेहमीप्रमाणे शेतकरी संकटात सापडल्यावर महसूल प्रशासन आणि विमा कंपन्या सुस्त का बसतात,कागदी घोडे नाचवणे बंद करा, सरडेवाडीतील नुकसानग्रस्त भागाचे आणि विशेषतः शेतकरी नितीन कोकरे यांच्या घराचे व गोठ्याचे तात्काळ पंचनामे झाले पाहिजेत, तात्काळ आर्थिक मदत: कसलीही तांत्रिक कारणे पुढे न करता सरकारने नितीन कोकरे यांना तातडीने घर आणि गोठा बांधणीसाठी भरीव शासकीय मदत जाहीर करावी, नुसती पोकळ आश्वासने नकोत, तर थेट खात्यात मदत जमा करून सरकारने आपली संवेदनशीलता दाखवून द्यावी.आशी जनतेत चर्चा,
टिप्पण्या