मुख्य सामग्रीवर वगळा

इंदापुरात अवकाळी वादळी पावसाचा तांडव; केळी, डाळिंब व ऊस पिकांचे कोट्यवधींचे नुकसान..!



भाजप नेते प्रदीप गारटकर आणि प्रविण माने यांनी घेतली नुकसानग्रस्त भागाची बांधावर जाऊन पाहणी; तात्काळ सरसकट पंचनामे व मदतीची मागणी

इंदापूर (प्रतिनिधी):

इंदापूर तालुक्यात काल झालेल्या भीषण अवकाळी वादळी पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. प्रामुख्याने केळी, डाळिंब, ऊस तसेच इतर भाजीपाला व फळबागांना या वादळाचा मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

तालुक्यातील वडापुरी, सुरवड, वकीलवस्ती, शेटफळ हवेली, बावडा, टणू, गणेशवाडी, पिंपरी बु., लाखेवाडी, गिरवी या गावांमध्ये या वादळी पावसाने मुख्यत्वे थैमान घातले. अनेक ठिकाणी केळीच्या बागा जमिनीदोस्त झाल्या असून झाडे उन्मळून पडली आहेत. डाळिंब बागांचेही अतोनात नुकसान झाले असून काढणीस आलेला ऊस वाऱ्यामुळे आडवा झाला आहे.

नेत्यांकडून प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी

या भीषण परिस्थितीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर व नेते प्रविण माने यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. त्यांनी वडापुरी, सुरवडसह विविध गावांमधील शेतकऱ्यांच्या थेट शेतातील बांधावर जाऊन पिकांच्या पडझडीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व या कठीण प्रसंगी शेतकऱ्यांना धीर दिला.

तात्काळ शासकीय मदतीची व पंचनाम्यांची मागणी

या पाहणी दौऱ्यानंतर प्रशासनाकडे तीव्र शब्दांत मागणी करताना नेते म्हणाले की, कृषी विभागाने कोणत्याही दिरंगाईशिवाय तात्काळ नुकसानग्रस्त भागाचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत. नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, तसेच सरसकट आणि योग्य नुकसानभरपाई त्वरित जाहीर करावी. शेतकरी आधीच विविध आर्थिक संकटांचा सामना करत असताना या नव्या संकटामुळे त्यांचे कंबरडे मोडले आहे, त्यामुळे शासनाने संवेदनशीलता दाखवणे गरजेचे आहे.

कृषिमंत्र्यांनी तालुक्याला सढळ हाताने मदत करावी: प्रदीप गारटकर

"राज्याचे कृषी मंत्री स्वतः इंदापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे त्यांनी तालुक्यातील या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दाहकता ओळखून सढळ हाताने आणि तातडीने मदत करावी. शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडलेला असताना अशा नैसर्गिक आपत्तींमुळे त्यांची परिस्थिती अधिकच बिकट होते. त्यामुळे शासनाने तात्काळ संवेदनशील भूमिका घेऊन विशेष आर्थिक मदत जाहीर करावी. शेतकऱ्यांनी या नैसर्गिक संकटात अजिबात खचून जाऊ नये, शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील यासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील."

प्रदीप गारटकर (ज्येष्ठ नेते, भाजपा)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...