२४ तासांच्या 'स्टेटस'मध्ये अडकलेला बाप व्हेंटिलेटरवर; गोळ्या संपल्यावर खेकसणारे 'भामटी पोरं सोशल मीडियावर फादर्स डे साजरा करतात.
महाराष्ट्र:- सगळेच सारखी नसतात पण अपवादात्मक काही बेगडी प्रेमाचा दिखावा करणारे लोकं सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत आज 'फादर्स डे'चा महापूर आला असून, एरवी बापाकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या कृतघ्न मुलांचा पुळका अचानक उफाळून आल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. २४ तासांनंतर गायब होणाऱ्या व्हाट्सॲप स्टेटसवर बापाला 'माझं आभाळ' ठरवणारे हेच ते 'भामटी पोरं' आहेत, जे प्रत्यक्ष आयुष्यात मात्र बापाच्या हक्काच्या गोळ्यांसाठीही घरात कटकट करत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे,.
आज सकाळपासूनच फेसबुक, इंस्टाग्रामवर "बाप माझा विठ्ठल" अशा कॅप्शनसह फोटोंची स्पर्धा लागली आहे. परंतु, याच विठ्ठलाला घरात साधी वागणूक कशी मिळते, याचा ग्राऊंड रिपोर्ट अत्यंत भयानक आहे.
बापाची शुगर वाढली किंवा बी.पी.ची गोळी संपली की "अजून मागच्या आठवड्यात तर आणून दिली होती, एवढ्या लवकर कशी संपली?" असा हिशोब मागणारे सुपुत्र आज सोशल मीडियावर बापावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. गोळ्यांच्या पैशांवरून घरात रोज वाद घालणारे हेच 'शहाणे' आज स्टेटसवर बापाचा आदर करण्याचे ढोंग करत आहेत.
बाप आजारी पडला की "मला ऑफिसमध्ये काम आहे", "तू एकटा जाऊन ये ना" किंवा "आईला सोबत घेऊन जा" अशी कारणे देणारी ही फेसबुकी मुले आज बापाच्या खांद्यावर हात ठेवून 'कूल' पोज देताना दिसत आहेत. बापाला वेळेवर दवाखान्यात नेण्यापेक्षा त्याचा फोटो एडिट करण्यात या मुलांचा जास्त वेळ जात असल्याचे समोर आले आहे.
तरुण वयात कुटुंबासाठी रक्त आटवणारा बाप आज म्हातारपणात मुलाच्या दोन गोड शब्दांसाठी आसुसलेला आहे. मात्र, मुलाला बापाशी संवाद साधायला वेळ नाही, कारण तो मोबाईलवर बापाच्याच फोटोला आलेल्या लाईक्स मोजण्यात व्यस्त आहे.
टिप्पण्या