इंदापूर:- वाढदिवसाला फटाके, केक, डीजे, डिजिटल फलक (बैनर) आणि हारतुरे यांसारख्या गोष्टींवर विनाकारण खर्च न करता, तोच पैसा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरण्याचा आदर्श पायंडा प्रविण माने यांनी घालून दिला. या अंतर्गत संपूर्ण तालुक्यात हजारो वह्या-पेनचे वाटप करण्यात आले. तसेच, सरडेवाडी शाळेसाठी भविष्यात कुठल्याही प्रकारची मदत लागेल, ती देण्याची संपूर्ण जबाबदारी माझी राहील,"अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रविण भैय्या माने यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, *"मी स्वतः जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे. आज अनेक मोठे अधिकारी हे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकूनच उच्च पदांवर कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा नेहमी मान राखला पाहिजे, तरच तुम्ही भविष्यात मोठे अधिकारी आणि एक उत्तम माणूस बनू शकाल.
या कौतुकास्पद उपक्रमाच्या वेळी परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि पदाधिकारी उपस्थित होते:
या प्रसंगी सरडेवाडी गावातील ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रविण भैय्या माने यांच्या या उपक्रमाचे संपूर्ण तालुक्यातून भरभरून कौतुक होत आहे.
टिप्पण्या