मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नातेपुते येथील डॉक्टरास सश्रम कारावासाची शिक्षा

वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ  पत्नीचा छळ करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या नातेपुते ( ता .माळशिरस ) येथील डॉक्टरास यु. व्ही. पेठे कोर्टाकडून पहिल्या गुन्ह्यात ८ महिने साधा कारावास तर दुसऱ्या गुन्ह्यात १ वर्षे सश्रम कारावासाच्या शिक्षेसह एकूण ३० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. डॉ बाबासाहेब दत्तात्रेय माने असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या १४ वर्षापूर्वी नातेपुते येथील डॉ.बाबासाहेब माने यांनी त्यांच्या पत्नी डॉ.जयश्री माने यांना मुलगी झाल्याच्या कारणावरून मारहाण व शिवीगाळ करून सतत अपमानास्पद वागणूक दिली होती.अशातच पहिली पत्नी जिवंत असताना दुसरे लग्न करून डॉ. बाबासाहेब माने याने २३ फेब्रुवारी २०११ रोजी पेशंट तपासण्याच्या कारणावरून पत्नी डॉ.जयश्री यांना काठीने मारहाण करून त्यांचे हाताचे हाड फ्रॅक्चर केले होते.या बाबतची फिर्याद डॉ जयश्री माने यांनी दाखल केल्यावर आरोपी डॉ बाबासाहेब माने यांच्याविरोधात भा. द. वि. ४९८ अ तसेच ३२६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा निकाल नुकताच ला...

*जिल्हा माहिती अधिकारी पदी युवराज पाटील रुजू*

पुणे, दि.२८:(जिमाका वृत्तसेवा): पुणे जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून युवराज पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी माहिती अधिकारी सचिन गाढवे यांनी त्यांचे स्वागत केले.  श्री. पाटील यांनी यापूर्वी सहायक संचालक मंत्रालय, सहायक संचालक विभागीय माहिती कार्यालय,पुणे तर अकोला, वाशिम,सातारा,लातूर आणि जळगाव येथे जिल्हा माहिती अधिकारी या पदावर काम केले आहे.  जिल्हा माहिती कार्यालयामार्फत शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणि विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणारे महत्वाचा दुवा मानला जातो. शासनाची ध्येयधोरणे आणि जनहिताचे कार्यक्रम प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहीन, असेही श्री. पाटील म्हणाले. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचा अनोखा गणेशोत्सव: पर्यावरण आणि समाजप्रबोधनाचा संगम

इंदापूर शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट गणेशोत्सवही पर्यावरणपूरक आणि सामाजिक संदेश देणाऱ्या अनोख्या पद्धतीने साजरा करत आहे. संस्थेच्या अध्यक्षा मा. पद्माताई भोसले,सचिव डॉ.गिरीश देसाई, खजिनदार श्री.तुषार रंजनकर, विश्वस्त श्री.अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणाचे रक्षण आणि समाजप्रबोधन या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधत, एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला आहे.       या उत्सवासाठी गणपतीची मूर्ती जुन्या वर्तमानपत्रांपासून बनवण्यात आली आहे. हि मूर्ती संस्थेच्या जावेद हबीब अकॅडमी विभागातील विद्यार्थ्यांनी बनवली असून मूर्तीची सजावट करण्यासाठी कागदी प्लेट्स आणि विविध प्रकारच्या कागदांचा वापर करून एक आकर्षक, देखावा तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, बाप्पांचे वस्त्र ट्रस्टच्या फॅशन डिझाइन विभागातील विद्यार्थ्यांनी तयार केले आहे, ज्यामुळे बाप्पांचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे.       या वर्षीच्या गणेशोत्सवाचा मुख्य विषय "मोबाईल व्यसनमुक्ती" आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे समाजात निर्माण होत असलेल्या समस्यांबाबत जनजागृती करणे हा यामागील मुख्...

*इंदापूर महाविद्यालय येथे रसायनशास्त्र विभागाच्या वतीने सेमिनार आयोजन*

इंदापूर महाविद्यालय येथे रसायनशास्त्र विभागाच्या वतीने अमर शेख हॉल येथे "सेफ हँडलिंग ऑफ केमिकल्स" या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. जयश्री गटकुळ यांनी केले आणि प्रा. श्वेता खोपडे खोपडे, प्रा.रोहित घाटगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संस्थाध्यक्ष मा. हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते प्रमुख वक्ते अनिकेत भुजबळ यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला.औद्योगिक क्षेत्र रसायनशास्त्र विषयावर अवलंबून असून या क्षेत्रात विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण भवितव्य आहे. विद्यार्थ्याच्या सुरक्षिते साठी या सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहेअसे मत डॉ जयश्री गटकुळ यांनी व्यक्त केले. रसायनशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना केमिकल आणि फार्मास्युटिकल कंपनी मध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध आहेत. रसायन ज्वलनशील आणि विषारी असतील तर विद्यार्थांनी केमिकल्स हाताळताना संरक्षणात्मक हातमोजे, चष्मा आणि मास्कचा वापर करावा असे आवाहन अनिकेत भुजबळ यांनी केले.डॉ.जीवन सरवदे,डॉ.राजेंद्र भोसले,डॉ.एम.पी. शिंदे,प्रा.योगेश झ...

*भिमाई आश्रमशाळेत जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न.*

इंदापूर ता.२५:  इतर मागास बहुजन कल्याण विभाग पुणे अंतर्गत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त इंदापूरच्या भिमाई आश्रमशाळेत जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन सोमवारी (दि.२५) करण्यात आले होते. मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या डॉ.  बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा उत्साहात पार पडली. संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे (काकी)  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे सचिव ॲड.समीर मखरे व मान्यवरांच्या हस्ते पार पडले. यावेळी तथागत गौतम बुद्ध मूर्तीस, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, राजमाता अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, माता रमाबाई आंबेडकर या बहुजन महामातांच्या प्रतिमांना व इंदापूरचे माजी नगराध्यक्ष व संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरे (तात्या) यांच्या प्रतिमांना महिला शिक्षकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  दीप प्रज्वलन उपस्थित शि...

सामाजिक समतोल राखत, सर्वांना बरोबर घेतल्याने गाव विकासामध्ये अग्रभागी-हर्षवर्धन पाटील•

इंदापूर : प्रतिनिधी दि.25/8/25                             सर्वसामान्य नागरिकांसाठी पिण्याचे पाणी व राहण्यासाठी घर महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने घरकुल योजनेचा सर्व्हे केल्याने बावडा ग्रामपंचायतीचा जिल्हामध्ये गौरव झाला आहे. आता नवीन पाणी पुरवठा योजनेमुळे बावडा ग्रामस्थांनी आगामी 50 वर्षे पिण्याच्या पाण्याची काळजी करू नये. सामाजिक समतोल राखत, सर्वांना बरोबर घेऊन काम केल्याने विकास कामांमध्ये गाव अग्रभागी राहिले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे रविवारी (दि. 24) केले.           बावडा ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजने (रु. 12. 05 कोटी) च्या 4 ठिकाणी बांधावयाच्या उंच साठवण टाक्यांचे भूमिपूजन, शॉपिंग सेंटर उभारणी व ग्रामसचिवालसमोर प्लेविंग ब्लॉक (रु. 25 लाख) टाकणे आदी कामांचे भूमिपूजन तसेच लोकनेते शहाजीराव (बापू) पाटील प्रवेशद्वार (गाव वेस ) चे लोकार्पण हर्षवर्...

इंदापूर दर्गाह मस्जिद शॉपिंग सेंटरमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

इंदापूर : आज इंदापूर दर्गाह मस्जिद शॉपिंग सेंटरच्या हॉलमध्ये टिपू सुलतान यंग सर्कल संचलित फातिमा शेख अभ्यासिका यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व प्रशस्तीपत्रक प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. या कार्यक्रमात इंदापूर शहरातील पाच विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उल्लेखनीय यशाचा गौरव करण्यात आला.  गौरविण्यात आलेले विद्यार्थी :, हाजी युसूफ शेख यांचे नातू मोहम्मद उमर समीर शेख यांची प्रतिष्ठित नासा अंतराळ संस्था (अमेरिका) येथे जाण्यासाठी निवड., डॉ. इरम अमजद मोमीन यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव (उस्मानाबाद) येथे MBBS साठी निवड.,अल्मास जाकीर मोमीन यांनी “कॉस्मेटिक लिक्विड अप्लिकेटर विथ मल्टी-इंटेन्सिटी व्हायब्रेशन मेकॅनिझम” या अभिनव डिझाईनवर मोठे यश संपादन करून दोन मानाचे सन्मान प्राप्त केले.,अर्शीया सादिक शेख यांची MIT MEERS कॉलेज, लातूर येथे (BPTH – मेडिकल फिजिओथेरपी) साठी निवड, जुनेद कासम बागवान यांची बॅचलर ऑफ आर्किटेक्चर अभ्यासक्रमासाठी निवड. या पाचही विद्यार्थ्यांचा स...

हर्षवर्धन पाटील मित्र परिवाराच्या वतीने इंदापूर हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमाने धुमधडाक्यात संपन्न

 इंदापूर:- महाराष्ट्र राज्याचे मा. सहकार व संसदीय कार्यमंत्री राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मा. हर्षवर्धनजी पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इंदापूर शहरातील मा.हर्षवर्धनजी पाटील मित्र परिवाराच्या वतीने इंदापूर शहरातील सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने अभिषेक करण्यात आला मा. हर्षवर्धनजी पाटील यांना दीर्घायुष्य लाभो तसेच त्यांची प्रगती होत जाओ इंदापूर तालुक्याची सेवा करण्याची त्यांच्यामध्ये शक्ती येवो ही प्रार्थना करण्यात आली तसेच त्यांच्या राजकीय जीवनामध्ये उत्तरा उत्तर प्रगती होत जाओ अशी मनोकामना करण्यात आली तसेच पाटील बंगला या ठिकाणी इंदापूर शहरातील कार्यकर्ते तसेच पाटील बंगला सोनाई नगर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्याचप्रमाणे वृक्ष संजीवनी परिवाराच्या वतीने व आय कॉलेज च्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले ग्रामीण रुग्णालय इंदापूर या ठिकाणी रुग्णांना फळे केळी बिस्कीट पाणी वाटप करण्यात आले इंदापूर क्रिटिकेअर सेंटर का ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले त्यानंतर मा. हर्षवर्धन पाटील...

पोलीस मित्र संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी पांडुरंग भुजबळ

वाल्हे प्रतिनिधी - सिकंदर नदाफ पोलीस मित्र सेवाभावी फाउंडेशनच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी वाल्हे ( ता. पुरंदर ) येथील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग रावसाहेब भुजबळ यांची निवड करण्यात आली आहे. पांडुरंग भुजबळ यांनी अनेक वर्षांपासून अपघात ग्रस्तांना मदत केली असून ग्राम सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी वेळोवेळी पोलीस प्रशासनाला देखील मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊनच पोलीस मित्र सेवाभावी फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र चौधरी यांनी पांडुरंग भुजबळ यांची पुणे जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी निवड केली आहे. या दरम्यान सोलापूरचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बोराडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे तसेच वाल्हे गावचे सरपंच अतुल गायकवाड यांसह नवमहाराष्ट्र युवक संघटना तसेच महात्मा फुले प्रतिष्ठान यांच्या वतीने पांडुरंग भुजबळ यांच्या निवडीबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यातआले आहे.

मा. मंत्री मा. हर्षवर्धनजी पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त इंदापूर शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन

इंदापूर:- राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, मा. मंत्री मा. हर्षवर्धनजी पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त इंदापूर शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, गुरुवार दिनांक २१ ऑगस्ट २०२५ सकाळी ८:०० वा,सकाळी ९:०० वा,सकाळी १०:०० वा,सकाळी ११:०० वाजता,सकाळी ११:३० वाजता अभिषेक - सिद्धेश्वर मंदिर, इंदापूर,वृक्षारोपण - पाटील बंगला,फळे वाटप - इंदापूर शासकीय रुग्णालय अभिष्टचिंतन सोहळा - नारायणदास रामदास हायस्कूल आरोग्य तपासणी शिबिर ,इंदापूर क्रिटिकेअर हॉस्पिटल बुलेट शोरूम पाठीमागे, इंदापूर वरील सर्व कार्यक्रमाचे आयोजन. हर्षवर्धनजी पाटील मित्र परिवार, इंदापूर शहर यांनी केले आहे.

इंदापूर येथील मोहम्मदउमर समीर शेख याची अमेरिकेतील नासा येथे अंतराळ संशोधन संस्था भेटीसाठी निवड.

इंदापूर - पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आंतर विद्यापीठ खगोलशास्त्र व खगोलभौतिकशास्त्र केंद्र (नासा) आणि भारतीय अंतराळ संस्था इस्रो या प्रतिष्ठित संस्थांना भेटीची संधी मिळावी यासाठी तीन टप्प्यांत चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. या उपक्रमासाठी आयुकाच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासक्रम तयार करण्यात आला होता. हा उपक्रम विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन क्षेत्रातील करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महत्वाचा आहे.एकूण १६ हजार१२१ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते.१३ हजार ६७१ विद्यार्थ्यांनी पहिली परीक्षा दिली.एक हजार ५४१ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली.मुलाखतीसाठी २३५ विद्यार्थी पात्र ठरले.७५ विद्यार्थी नासा व इस्रोला जाण्यासाठी पात्र ठरले.यापैकी २५ विद्यार्थ्यांची नासासाठी व ५०विद्यार्थ्यांची इस्रोला जाण्यासाठी निवड करण्यात आली आहे. इंदापूर तालुक्यातील ४७२ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.ऑनलाईन परीक्षेसाठी ४९ तर तिसऱ्या टप्प्यात मुलाखतीसाठी १२ विद्यार्थ्यांची निवड झाली होती.जिल्हा परिषद शाळा शहा,इंदापूर येथील मोहम्मदउमर समीर शेख हा सहावीत शिकणा...

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी तसेच चेतना इंटरनॅशनल,& चेतना जुनियर कॉलेज येथे ७९वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

इंदापूर: - सरडेवाडी (ता. इंदापूर) येथील चेतना फाउंडेशन संचलित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी तसेच चेतना इंटरनॅशनल स्कूल आणि चेतना जुनियर कॉलेज येथे ७९ स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी पतंजली योग समितीचे प्रमुख इंदापूरचे दत्तात्रेय अनपट तसेच,उद्योजक संदीप जाधव आणि माननीय गोपीनाथ मोरे, निर्मिती कन्स्ट्रक्शन चे सर्वेसर्वा यांनी भूषवले.यावेळी चेतना फाउंडेशनचे अध्यक्ष उदयशेठ देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने व चेतना कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य, डॉ. गणेश म्हस्के व चेतना इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य निकिता माने आधी उपस्थित होते याप्रसंगी प्रथम वर्ष बी. फार्मसी परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. तसेच पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धामध्ये सहभागी झालेल्या यशस्वी मुलींचे ही सत्कार करण्यात आले. तसेच चेतना इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग केलेला होता. त्याच्यामध्ये भाषण, लेझीम, मास पीटी अशा विविध कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्...

*इंदापूरच्या आश्रमशाळेत ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.*

इंदापूर ता.१५ : मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या अंकित असणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे आणि मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त हवालदार मधुकर जगताप यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१५) सकाळी ८:१५ वाजता ध्वजारोहण उत्साहात पार पडले. यावेळी ध्वजपूजन सामाजिक कार्यकर्ते माऊली नाचण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माजी नगराध्यक्ष व संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर (तात्या) मखरेंच्या प्रतिमांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत, राज्यगीत व ध्वजगीत विद्यार्थ्यांनी सादर केले. यावेळी कार्यक्रमास माजी नगरसेविका व संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे (काकी), उपाध्यक्ष तानाजी मिसाळ, सचिव ॲड.समीर मखरे, संचालक गोरख तिकोटे, राहुल सवणे,संजय कांबळे,डॉ. अनार्या मखरे, गणेश महाजन, अविनाश कोतमिरे, शिवाजी चंदनशिवे, जावेद मुंडे, सुरज धाईंजे, गोरख च...

सरडेवाडी येथे पाच शाळेत आ.दत्तामामा भरणे वि.का.स. संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल महाडिक मित्र परिवाराच्या वतीने शालेय उपयोगी साहित्य व खाऊ वाटप

इंदापूर:- स्वतंत्र दिना निमित्त सरडेवाडी येथे पाचही शाळेत दत्ता मामा भरणे वि.का.स. संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल महाडिक व मित्र परिवाराच्या वतीने शालेय उपयोगी साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.सरडेवाडी शाळेत शालेय साहित्य वाटप करतेवेळी सरपंच सौ. सुप्रियाताई माने - कोळेकर, चेअरमन श्री विठ्ठल महाडिक, मा. उप सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हनुमंत जमदाडे पत्रकार आसिफ भाई शेख, महादेव जानकर, राम कोकरे, मुख्याध्यापक शफीक शेख,शिक्षक मोहनलाल पवार,शोभा चंदनशिवे,जोती गोसावी हे उपस्थित होते तसेच गायकवाड वस्ती शाळेत जेष्ठ मार्गदर्शन चित्तरंजन (आबा) पाटील, माजी सरपंच अभिमान गायकवाड, श्रीरंग (दादा) गायकवाड, केशव गायकवाड, समाधान शिंदे, नितीन शिंदे, मुख्याध्यापक हरीचंद्र कवडे,जाधव -भगतवस्ती शाळा येथे  माजी सरपंच देविदास (आण्णा)कडाळे बाळासाहेब जाधव, सोमनाथ नायकुडे,व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कोळेकर वस्ती शाळा येथे ग्रामपंचायत सदस्य गोकुळ (तात्या) कोकरे, नानासाहेब हरणावळ, सुहास कोळेकर, ऋषिकेश शिंगाडे, दत्ता होनमाने, संग्राम होनमाने, उत्तम (दादा)शिद, विकास शिद म...

सरडेवाडी येथे पाच शाळेत आ.दत्तामामा भरणे वि.का.स. संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल महाडिक मित्र परिवाराच्या वतीने शालेय उपयोगी साहित्य व खाऊ वाटप

 इंदापूर:- स्वतंत्र दिना निमित्त सरडेवाडी येथे पाचही शाळेत दत्ता मामा भरणे वि.का.स. संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल महाडिक व मित्र परिवाराच्या वतीने शालेय उपयोगी साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.सरडेवाडी शाळेत शालेय साहित्य वाटप करतेवेळी सरपंच सौ. सुप्रियाताई माने - कोळेकर, चेअरमन श्री विठ्ठल महाडिक, मा. उप सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हनुमंत जमदाडे पत्रकार आसिफ भाई शेख, महादेव जानकर, राम कोकरे, मुख्याध्यापक शफीक शेख,शिक्षक मोहनलाल पवार,शोभा चंदनशिवे,जोती गोसावी हे उपस्थित होते तसेच गायकवाड वस्ती शाळेत जेष्ठ मार्गदर्शन चित्तरंजन (आबा) पाटील, माजी सरपंच अभिमान गायकवाड, श्रीरंग (दादा) गायकवाड, केशव गायकवाड, समाधान शिंदे, नितीन शिंदे, मुख्याध्यापक हरीचंद्र कवडे,जाधव -भगतवस्ती शाळा येथे  माजी सरपंच देविदास (आण्णा)कडाळे बाळासाहेब जाधव, सोमनाथ नायकुडे,व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कोळेकर वस्ती शाळा येथे ग्रामपंचायत सदस्य गोकुळ (तात्या) कोकरे, नानासाहेब हरणावळ, सुहास कोळेकर, ऋषिकेश शिंगाडे, दत्ता होनमाने, संग्राम होनमाने, उत्तम (दादा)शिद, विका...

सरडेवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ.गयाबाई अभिमान तोबरे यांची निवड

इंदापूर सरडेवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ.गयाबाई अभिमान तोबरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.वैशाली मल्हारी शिद यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदीं सौ.गयाबाई अभिमान तोबरे यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष स्थानी सरपंच सौ.सुप्रीया माने होत्या ग्रामसेवक जाधवर यांनी कामकाज पाहिले. गयाबाई तोबरे यांची निवड जाहीर होताच तोबरे समर्थकांनी हलगी, फटाके गुलाल उधळत एकच जल्लोष केला. त्यावेळी मा. उपसरपंच मोहन (बापू) सरडे, उद्योजक रघुनाथ (आण्णा) जमदाडे, दत्ता मामा भरणे विकास संस्थेचे चेअरमन विठ्ठल महाडिक, बाळासाहेब जाधव, प्रसन्न गायकवाड,व समस्त ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष हनुमंत (आबा) कोकाटे व इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर मामा भरणे यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पतंजली परिवाराचा रक्षाबंधन हा स्तुत्य उपक्रम - नगराध्यक्षा सौ.अंकिताताई शहा

इंदापूर:- पतंजली योग परिवार व महिला पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व पारंपारिक उत्सव दिमाखदार पद्धतीने साजरे केले जातात, अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी भाग्य लागतं असे गौरवोद्गार ,नगराध्यक्षा सौ. अंकिताताई शहा यांनी काढले.  रक्षाबंधनाचा औचित्य साधून मागील दहा वर्षापासून स्थायी वर्गामध्ये विशेषता महिला भगिनी सर्व धर्मीय समभावाची भावना मनात जपून उपस्थित पुरुष बांधवांना राखी बांधून निरोगी आयुष्यासाठी मनोकामना करतात. या कार्यक्रमासाठी इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ अंकिता ताई शहा त्याचबरोबर शहा ग्लोबल स्कुलचे विश्वस्त श्री मुकुंद शेठ शहा आवर्जून उपस्थित होते. यावेळी उपस्थित भगिनींना योगाचे मॅट गिफ्ट देण्यात आले. रक्षाबंधनाच्या सणानिमित्त महिला ह्या सर्व बंधूंच्या घरी जातात, परंतु पतंजली परिवारातील महिला भगिनी या आवर्जून या उत्सवासाठी थांबतात व वर्गातील रक्षाबंधन झाल्यानंतरच आपापल्या गावी रवाना होतात.  पतंजली परिवारातील प्रत्येक पारंपारिक कार्यक्रमाचा इंदापूर शहरातील नागरिक आदर्श घेतात असे श्री मुकुंद शेठ...

इंदापुर बसस्थानकात साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

इंदापूर:- आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव कमिटी इंदापुर आगार यांच्याकडुन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे उदघाटन कार्यक्रमाचे उदघाटक मा शिवाजीराव मखरे (जिल्हा कार्याध्यक्ष-आर पी आय आठवले गट) मुख्य व्याख्याते- च़द्रशेखर गायकवाड प्रमुख पाहुणे =विश्वनाथ खटावकर -अभ्यासक ग्राहक संरक्षण कायदा अध्यक्ष -संजय वायदंडे ‌वाहतूक अधीक्षक ईंदापूर आगार यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आले आयोजक-अर्जुन भडकवाड (संस्थापक अध्यक्ष -साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बहुऊद्देशीय संस्था इंदपूर  डॉ अण्णा भाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती निमित्त कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयातील 5‌वी 12 वी पर्यतच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा अण्णाभाऊ साठे स्वलिखित साहित्य आणि शालेय साहित्य (वही,पेन,पुस्तक )ईत्यादी मोफत वाटप करणेत आली सूत्रसंचालन अर्जुन भडकवाड यांनी केले,प्रमुख पाहुणे- मसुदेव रणदिवे ऊपाध्यक्ष ग्रामपंचायत कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य प्रमुख नागेश गायकवाड़ सरचिटणीस अनु.जाती मोर्चा पुणे जिल्हा, अमोल मिसाळ अध्यक्ष इंदापुर शहर आरपीआय,अँड.आनंद के कान ...

*जयभवानी गड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीच्या विद्यार्थ्यांनी सैनिकांसाठी बनवल्या आकर्षक राख्या*

  इंदापूर:- जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये,  राष्ट्रीय सुरक्षा व एकता अबाधित ठेवणाऱ्या तसेच परकीय, अंतर्गत आक्रमणापासून देशाचे रक्षण करणाऱ्या, सीमेवर शांतता व सुरक्षा कायम ठेवणाऱ्या सैनिकांसाठी राखी बनवण्याचा अनोखा उपक्रम केला. कुटुंबापेक्षा राष्ट्र महत्त्वाचे आणि राष्ट्रासाठी आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वेळ देणाऱ्या सर्व वीर जवानाप्रती असलेल्या कृतज्ञतेच्या जाणीवेतून , भारत मातेच्या रक्षण करणाऱ्या बंधूला दीर्घायु लाभावे या उद्देशाने आपली बहीण या नात्यानेच हितचिंतक म्हणून सैनिकांसाठी स्वतःच्या कौशल्याने वेगवेगळ्या पद्धतीच्या, आकर्षक राख्यांची आकर्षक निर्मिती प्रशालेमधील विद्यार्थ्यांनी स्वतः केली. हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशालेतील मार्गदर्शक शिक्षिका ट्विंकल देशमुखे व दिपाली चव्हाण, निकिता भोई यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले . समाज जीवन जगत असताना आपण कोणाच्यातरी ऋणात राहत अस...

इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी गायकवाड वस्ती येथे आधार कार्ड शिबीर

 इंदापूर:- दि. 2/8/25 रोजी सरडेवाडी गायकवाड वस्ती येथे आधार कार्ड शिबीर आयोजित करण्यात आले होते, शिबीरामध्ये आधार कार्ड अध्यावत, नवीन आधार कार्ड काढणे, तसेच आयुष्यमान भारत कार्ड, विश्वकर्मा योजनेचे फार्म, मतदार कार्ड, पॅन कार्ड,ई श्रम कार्ड, आधार कार्ड अपडेट करणे,लग्ना नंतरचे नाव बदलने, आधार कार्ड वरील फोटो व बोटाचे ठसे बदलने, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करने हरवलेले आधार कार्ड काढणे. इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.शिबीरामध्ये १३० लाभार्थी यांनी लाभ घेतला. शिबीर यशस्वी करण्यासाठी. केशव गायकवाड, समाधान शिंदे,मा . ग्रामपंचायत सदस्य महादेव शिंदे, हनुमंत (बापू) गायकवाड, श्रीरंग (दादा) गायकवाड, बंडु गायकवाड, अमोल शिद, गणेश गायकवाड, सागर गायकवाड, सौरभ दयानंद गायकवाड, पप्पु शेठ गायकवाड,लखन गायकवाड, सोमा गायकवाड, राहुल गायकवाड, अजित शिद, संतोष गायकवाड, विवेक शिद, सतिष गायकवाड व सर्व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.