इंदापूर महाविद्यालय येथे रसायनशास्त्र विभागाच्या वतीने अमर शेख हॉल येथे "सेफ हँडलिंग ऑफ केमिकल्स" या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. जयश्री गटकुळ यांनी केले आणि प्रा. श्वेता खोपडे खोपडे, प्रा.रोहित घाटगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संस्थाध्यक्ष मा. हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते प्रमुख वक्ते अनिकेत भुजबळ यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला.औद्योगिक क्षेत्र रसायनशास्त्र विषयावर अवलंबून असून या क्षेत्रात विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण भवितव्य आहे. विद्यार्थ्याच्या सुरक्षिते साठी या सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहेअसे मत डॉ जयश्री गटकुळ यांनी व्यक्त केले. रसायनशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना केमिकल आणि फार्मास्युटिकल कंपनी मध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध आहेत. रसायन ज्वलनशील आणि विषारी असतील तर विद्यार्थांनी केमिकल्स हाताळताना संरक्षणात्मक हातमोजे, चष्मा आणि मास्कचा वापर करावा असे आवाहन अनिकेत भुजबळ यांनी केले.डॉ.जीवन सरवदे,डॉ.राजेंद्र भोसले,डॉ.एम.पी. शिंदे,प्रा.योगेश झगडे, सचिन खरात प्रा.प्रांजली माने, प्रा.कविता देवकाते, प्रा.फर्जना शेख आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम साठी सारिका चव्हाण आणि संतोष खाडे यांनी अथक परिश्रम घेतले, प्रा सचिन खरात यांनी आभारप्रदर्शन केले.
इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वहात होता. बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...
टिप्पण्या