पत्नीचा छळ करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या नातेपुते ( ता .माळशिरस ) येथील डॉक्टरास यु. व्ही. पेठे कोर्टाकडून पहिल्या गुन्ह्यात ८ महिने साधा कारावास तर दुसऱ्या गुन्ह्यात १ वर्षे सश्रम कारावासाच्या शिक्षेसह एकूण ३० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.डॉ बाबासाहेब दत्तात्रेय माने असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या १४ वर्षापूर्वी नातेपुते येथील डॉ.बाबासाहेब माने यांनी त्यांच्या पत्नी डॉ.जयश्री माने यांना मुलगी झाल्याच्या कारणावरून मारहाण व शिवीगाळ करून सतत अपमानास्पद वागणूक दिली होती.अशातच पहिली पत्नी जिवंत असताना दुसरे लग्न करून डॉ. बाबासाहेब माने याने २३ फेब्रुवारी २०११ रोजी पेशंट तपासण्याच्या कारणावरून पत्नी डॉ.जयश्री यांना काठीने मारहाण करून त्यांचे हाताचे हाड फ्रॅक्चर केले होते.या बाबतची फिर्याद डॉ जयश्री माने यांनी दाखल केल्यावर आरोपी डॉ बाबासाहेब माने यांच्याविरोधात भा. द. वि. ४९८ अ तसेच ३२६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा निकाल नुकताच लागला असून यातील आरोपीस ४९८ अ मध्ये ८ महिने साधा कारावास व १०,००० रु दंड,तसेचदंड न भरल्यास १ महिने साधी कैद, यांसह कलम ३२६ मध्ये १ वर्ष सश्रम कारावास व २०'००० रु दंड, दंड न भरल्यास २ महिने सश्रम कारावास अशी सजा न्यायाधीश यु.व्ही.पेठे यांनी सुनावली आहे .या प्रकरणी पोलिस उपअधीक्षक संतोष वाळके,सरकारी वकील अँड.कश्यप,प्रभारी अधिकारी महारुद्र परजणे आदींनी काम पाहिले.
टिप्पण्या