इंदापूर सरडेवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ.गयाबाई अभिमान तोबरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.वैशाली मल्हारी शिद यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदीं सौ.गयाबाई अभिमान तोबरे यांची निवड करण्यात आली.
अध्यक्ष स्थानी सरपंच सौ.सुप्रीया माने होत्या ग्रामसेवक जाधवर यांनी कामकाज पाहिले.
गयाबाई तोबरे यांची निवड जाहीर होताच तोबरे समर्थकांनी हलगी, फटाके गुलाल उधळत एकच जल्लोष केला.
त्यावेळी मा. उपसरपंच मोहन (बापू) सरडे, उद्योजक रघुनाथ (आण्णा) जमदाडे, दत्ता मामा भरणे विकास संस्थेचे चेअरमन विठ्ठल महाडिक, बाळासाहेब जाधव, प्रसन्न गायकवाड,व समस्त ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष हनुमंत (आबा) कोकाटे व इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर मामा भरणे यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
टिप्पण्या